पुष्पा सिनेमातील डायलॉगस वर रिल्स बनवायच्या मोहापासून मराठी स्टार देखील सुटले नाहीत! पहा ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपाचा हा मजेशीर अंदाज!

नुकताच रंग माझा वेगळा फेम दीपा शिंदेने अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमातील एका डायलॉरवर भन्नाट रील्स बनवलं आहे. सध्या रेश्माचं हे रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दीपाच्या या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट व्हिडीओला तिच्या फॅन्सकडून खूप पसंती मिळतानाचे चित्र दिसत आहे!

साउथचा स्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा गेल्या महिन्यात पुष्पा हा भन्नाट चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दमदार कमाई केली. इतकेच नाही तर या चित्रपटातील डायलॉग, गाण्यांनी तर सिनेरसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. याचा धुमाकूळ सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून दररोज पाहायला मिळतच आहे. अनेकांवर अजूनही पुष्पा फिव्हर चढलेला दिसत आहे. याच दरम्यान रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचली आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर खूप एक्टिव्ह असताना दिसते आणि याच माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. तसेच या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ती नवनवीन अपडेट देखील देत असते. दरम्यान तिने तिचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यात ती निळ्या रंगाची सुंदर साडी नेसलेली असून पुष्पाच्या अंदाजात एक डायलॉग बोलताना दिसत आहे. तिचा व्हिडीओतील मजेशीर अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा माध्यमातून तिचे चाहते प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत!

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

तिचे या व्हिडिओमधील हावभाव खरोखरच पाहण्यालायक असेच आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिनं गमतीने अस देखील म्हटलं आहे की,

“इंडियन गर्लफ्रंड असलेल्यांनी देखील लाईक्स करायचे असं..” तिच्या या व्हिडिओवर नेटकरी कमेंटचा तुफान पाऊस पाडत आहेत.

रंग माझा वेगळा मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, आयशा आणि श्वेताचा प्लान फ्लॉप ठरतो. आयशा कार्तिक आणि दीपिकाला घेऊन कायमची युएसला जाणार होती. मात्र आयशाने दीपाला कोंडून ठेवल्यानंतर आणि सौंदर्याला या दोघींचा प्लान कळल्यानंतर ते एअरपोर्टला जातात. तिथे कार्तिकला जाण्यापासून रोखतात. तसेच दीपिका आणि कार्तिकीच्या मैत्रीत आलेला दुरावादेखील दूर होतो. त्यामुळे कार्तिक आता आयशाला आपल्या या कृत्यासाठी माफ करेल का, हे पाहणे अगदी उत्कंठावर्धक ठरणार आहे एवढं नक्की!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप