चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर फाफ डू प्लेसिस आगामी IPLहंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळताना दिसणार आहे. IPL 2022 मेगा लिलावमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसला विकत घेण्यासाठी RCB, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बोली युद्ध सुरू होते, पण शेवटी RCB ने डु प्लेसिसला 7 कोटींची बोली लावली. एबी डिव्हिलियर्सच्या बाहेर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक खेळाडू संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.
View this post on Instagram
फाफ डू प्लेसिसला बंगळुरू संघात सामील झाल्यानंतर मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डु प्लेसिसने म्हटले आहे की, नवीन संघासह माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. मला लिलावात घेतल्याबद्दल, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला तुमच्या संघात समाविष्ट केल्याबद्दल RCB संघाचे खूप खूप आभार. आरसीबीसोबत भविष्यातील संधी खूप रोमांचक असतील. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेल याची खात्री करून घेईन. लवकरच आपण सर्व भेटू अशी आशा आहे.
View this post on Instagram
फॅफ ला विकत घेतल्यानंतर आरसीबी चे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये हेसन म्हणाले, ‘हा आमच्या योजनेचा एक भाग होता. तो खूप अनुभवी खेळाडू आहे आणि टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. हे आमच्या संघाला चांगले संतुलन देईल. तो नेतृत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.