IPL संघांच्या कर्णधारांमध्ये फाफ डू प्लेसिस घेतो सर्वात कमी पगार, जाणून घ्या कोणाला किती पगार मिळतो..!!

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरणार आहेत.

पण तुम्हाला आजून एक रोमांचक गोष्ट आहि सांगणार आहोत. तुम्हाला सर्व संघांचे कर्णधार तर माहीतच असतील पण त्यांचे पगार माहित आहेत का? IPL संघांच्या कर्णधारांमध्ये फाफ डू प्लेसिसचे सर्वात कमी पगार आहे, तर मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. म्हणजेच त्याला एका हंगामासाठी १६ कोटी रुपये मिळतील.याबरोबरच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजालाही त्याच्या फ्रँचायझीने १६ कोटींमध्ये कायम ठेवले होते.

View this post on Instagram

A post shared by Faf du plessis (@fafdup)

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही आतापासून प्रत्येक हंगामात १५ कोटी मिळणार आहेत. या रकमेसाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला कायम ठेवले होते.
गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएल लिलावापूर्वी गुजरात फ्रँचायझीने १४ कोटींच्या ड्राफ्टमध्ये त्याचा समावेश केला होता.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार आहे. आयपीएल मेगा लिलावापूर्वी लखनऊ  फ्रँचायझीने त्याला १७ कोटी रुपयांना कायम ठेवले होते. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला आयपीएलच्या एका मोसमासाठी १५ कोटी रुपये मिळतात. या मोठ्या लिलावापूर्वी त्याला या पगारावर कायम ठेवण्यात आले होते. यावेळच्या आयपीएल मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला १४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले होते. म्हणजेच आतापासून त्यांना एका हंगामासाठी १४ कोटी रुपये मिळतील.

आयपीएल मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवालचा एका मोसमासाठी १२ कोटींचा पगार आहे. पूर्वी त्याला १ कोटी मिळायचे. आयपीएलच्या कर्णधारांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला सर्वात कमी मानधन मिळते. त्याला आरसीबीने 7 कोटींना विकत घेतले.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप