आयपीएल च्या १५ व्या हंगामात युवा खेळाडूंनी त्यांच्या उत्तम कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आयुष बडोनी, टिळक वर्मा, शाहबाज अहमद या नवीन खेळाडूंनी आता पर्यंत आपली ताकद दाखवून दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून मुंबई इंडियन्स विरुद्ध चमकदार कामगिरी करणारा सलामीवीर अनुज रावत ने ही या यादीत आपले नाव जोडले आहे. डाव्या हाताचा सलामी वीर अनुज रावत ने मुंबई विरुद्ध ६६ धावांची शानदार खेळी खेळली होती.
बंगळुरूचा सलामीचा फलंदाज अनुज रावत ने ४७ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदती ने ६६ धावा केल्या होत्या. अनुज च्या या खेळी नंतर त्याचा साथीदार बेंगळुरू चा कर्णधार फाफ डू प्लेसिसने ही त्याचे जोरदार कौतुक केले आहे. फॅफ च्या मते, अनुज रावत हा जागतिक क्रिकेटचा भविष्यातील स्टार आहे. तो म्हणाला, लीग सुरू होण्या पूर्वी मी त्याच्या बद्दल बोललो होतो. आमच्यात खूप चर्चाही झाल्या आहेत. तो आता ज्या पद्धती ने खेळतो आहे, ते खूपच प्रशंसनीय आहे.
View this post on Instagram
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला, तो ज्या आत्मविश्वासाने विकेट च्या बाहेर जाऊन शॉट्स खेळतो तोच त्याला सर्वोत्तम बनवतो. आमच्या साठी ते पुरेसे चांगले आहे. भविष्यात ही तो उत्तम खेळाडू असल्या चे सिद्ध होईल. अनुज रावत च्या खेळी मुळे बेंगळुरू ला मुंबई विरुद्ध विजयाची नोंद करणे सोपे झाले होते. अनुज रावत ने कर्णधार फाफ डू प्लेसिस सोबत ५० धावांची भागीदारी केली, तर विराट कोहली सोबत दुसऱ्या विकेट साठी ८० धावांची भागीदारी केली होती.
या आयपीएल मधील फलंदाज अनुज रावत ची ही पहिली मोठी खेळी आहे, या आधी अनुज ला पंजाब विरुद्ध २१ धावा आणि राजस्थान विरुद्ध २६ धावा केल्या होत्या. यांच्या समोर अनुजला चांगली सुरुवात करता आली न्हवती. बेंगळुरू ने मुंबई इंडियन्स चा ७ विकेट्स ने पराभव करत तिसरा सामना जिंकला होता. ग्लेन मॅक्सवेल चे पुनरागमन आणि दिनेश कार्तिक च्या फिनिशिंग मुळे बेंगळुरू या मोसमातील विजेते पदाच्या प्रबळ दावेदारापैकी एक बनला आहे.