कोरियाचा फेमस युट्युबर शिकलाय CID पाहून हिंदी! त्याच हिंदी ऐकाल तर म्हणाल , “वाह क्या बात हें!”

सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे कानाकोपऱ्यात पसरलेले जग अगदी जवळ आल्याचे भासते. फेसबुक ,ट्विटर , इंस्टाग्राम यांसारख्या गोष्टींमधून वेगवेगळ्या भाषेतील लोक, त्यांची गाणी , त्यांच्या भाषेतील चित्रपटांमध्ये असणारे फेमस डायलॉग, त्यावर बनणारे रिल्स किंवा व्हिडिओ या सर्वांच्या माध्यमातून एक प्रकारे भाषेची देवाण-घेवाण होताना दिसते.

यु ट्यूब वरती वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या देशातील हिरो-हिरोईन त्यांच्या पारंपरिक भाषेतील सिरीयल, त्यांचे चित्रपट, वेब सिरीज, गाणी सर्व काही प्रदर्शित होत असतं. जगभरातील लोकांना त्याचा अर्थ समजावा म्हणून त्यांच्या भाषेच्या डायलॉग बरोबरच शेवटी इंग्लिशमध्ये सबटायटल देखील दिलेल्या असतात. त्यामुळे कोरियन ड्रामा त्यातली भाषा समजत नसली तरी इंग्लिश सबटायटल मुळे भारतीय लोक कोरियन आणि त्या टर्किश ड्रामाच्या प्रेमात पडलेल्या दिसतात! सर्वे अगदी आवडीने कोरियन ड्रामा आपल्या हिंदी सिरियल प्रमाणेच पाहताना दिसतात.

गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट मुळे कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा प्रेक्षकवर्ग कोणत्याही ठराविक भाषेपुरता मर्यादित राहिला नसून तो वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट, वेबसीरिज पाहू लागला आहे. यामध्येच सध्या कोरियन ड्रामा वेबसीरिज पाहणाऱ्या भारतीय प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या प्रेक्षकवर्गाप्रमाणेच असेही काही कोरियन नागरिक आहेत ज्यांचा खासकरुन बॉलिवूड वा हिंदी चित्रपट, मालिका पाहण्याकडे कल वाढत आहे. यामध्येच एका कोरिअन नागरिकाने चक्क CID पाहून हिंदी भाषा शिकल्याचं समोर आलं आहे. अशीच नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचत राहा!

सध्या सोशल मीडियावर जुन हाक ली या कोरियन युट्यूबरची चर्चा रंगली आहे. जुन हाक ली हा दक्षिण कोरियाचा नागरिक असून तो हिंदी भाषा शिकत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या प्रवासात CID आणि आमीर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाचा मोठा वाटा आहे. ली ने त्याच्या युट्यूबवर चॅनेल वर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयीची माहिती सर्वांना दिली आहे.

ली १५ वर्षांचा असताना त्याच्या शाळेत शिक्षकांनी त्यांना ‘3 इडियट्स’ हा चित्रपट दाखवला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर ली हिंदी भाषेकडे आकर्षित झाला आणि त्याने हिंदी शिकण्याचा निर्धार केला. प्रथम दोन महिने ली ने काही पुस्तकांच्या मदतीने हिंदी भाषा शिकली. त्याच्या मतानुसार, हिंदी आणि कोरिया भाषेत बरंच साम्य आहे. या दोघांमधील व्याकरणही बऱ्यापैकी सेम आहे.

हिंदी शिकण्यासाठी त्याने सुप्रसिद्ध CID मालिका पाहायला सुरुवात केली. तसेच अजून चांगले हिंदी शिकण्यासाठी ली ने भारतात येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यावर त्याने काही भारतीय नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. युपी, बिहार मधील लोकांसोबत वेळ घालवला तसंच काही हिंदी टीव्ही मालिकाही पाहू लागला. यात त्याने CID आवर्जुन पाहिले. विशेष म्हणजे CID च्या एसीपी प्रद्यूममुळे माझं हिंदी अजून चांगलं झालं असं ली ने या व्हिडिओ मधून सांगितलं.

दरम्यान, ली ने त्याचं एक युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. ‘कोरिया का लाला’ असं त्याच्या युट्यूब चॅनेलचं नाव असून २ लाखांपेक्षा जास्त त्याचे फॉलोअर्स आहेत. या चॅनेवर तो त्याचे हिंदी भाषेतील व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या देशाचीही हिंदीत माहिती देत असतो. हिंदीसोबतच ली बंगाली भाषाही चांगली बोलताना दिसतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप