मुंबई-आरसीबी मॅच दरम्यान मैदानात आलेल्या फॅनला झाली अटक..!आता भेटू शकते हि शिक्षा

पुण्यात मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्या दरम्यान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका फॅनला पोलिसांनी अटक केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माशी बोलण्या साठी हा चाहता मैदानावर गेला होता. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कारवाई करत या फॅनला पकडले होते.

चाहत्याने एमसीए स्टेडियम च्या रेलिंग वरून उडी मारली आणि मैदानावर धाव घेतली होती. या चाहत्याने ग्राउंड वर पोलिस अधिकाऱ्यांशी वादही घातला होता. हाणामारी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, दशरथ राजेंद्र जाधव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेवर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे बाकी आहे. मैदानावर अशाप्रकारे घुसण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. तसेच त्याला काही महिन्यासाठी जैलची हवा खावी लागेल आता

आयपीएल मध्‍ये कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था असतानाही या चाहत्‍याला रेलिंग वरून उडी मारून ग्राउंड वर येण्‍यात यश मिळाले होते. तो आपल्या दोन स्टार खेळाडूंना भेटण्या साठी मैदानावर गेला होता. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असताना ही चाहत्यांने ते कसे तोडले याचाही तपास सुरू आहे. दशरथला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या चाहत्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले होते. तो पर्यंत सामनाही विस्कळीत झाला होता.

तत्पूर्वी, रोहित च्या नेतृत्वा खाली भारत आणि श्रीलंका यांच्या तील दिवस- रात्र कसोटी सामन्या दरम्यान, काही चाहत्यांनी बेंगळुरू च्या चिन्नास्वामी स्टेडियम मधील सुरक्षा घेरा तोडून मैदानात प्रवेश केला होता. यातील एका चाहत्याने विराट कोहली सोबत सेल्फी घेण्यातही यश मिळवले होते. त्यानंतर चार चाहत्यांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. त्याआधी, २०२१ मध्ये न्यूझीलंडच्या भारत दौऱ्या दरम्यान, रांची मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्या दरम्यान एका चाहत्या ने मैदानात घुसून रोहित च्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई इंडियन्स ची आयपीएल मोहीम आता पर्यंत खराब झाली आहे. यंदा खेळल्या गेलेल्या सलग चार सामन्यांत मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्या मध्ये रोहित शर्मा कोणत्या रणनीती खाली मैदानात उतरणार हे पाहणे बाकी आहे. आरसीबी विरुद्ध मुंबईला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप