कोहलीची विकेट घेतल्यावर आवेश खानने केले असे घाणेरडे कृत्य, पाहून चाहत्यांनी व्यक्त केला संताप.!!

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरले आहेत.

आज आयपीएल सीझन १५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएल एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore)

सामन्यापूर्वी पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा विलंब झाला, पण मॅच रद्द झाली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. तर पराभूत होणारा संघ आयपीएलमधून बाहेर पडेल. आजच्या नाणेफेकमध्ये केएल राहुलने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ त्यांचा शेवटचा सामना जिंकला पण तरीही त्यांनी संघात दोन बदल केले पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या संघात एकही बदल केला नाही.

प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही परंतु शेवटच्या काही शतकात धावांचा पाऊस पाडत त्यांनी धावांचा मोठा डोंगर उभा केला. पुन्हा एकदा कर्णधार फाफ डु प्लेसिस खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदार आणि विराट कोहलीने डावाची धुरा सांभाळली.

पहिला विकेट गमावल्यानंतर दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव पुढे नेला. जिथे विराट कोहली पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये आल्याचे दिसत होता पण त्यानंतर तो २५ धावांवर बाद झाला. ९ व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर आवेश खान चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मोहसीन खानने बाऊंड्री लाइनवर झेलबाद झाला.
तुम्हाला सांगतो, मोहसीन खानने कॅच पकडताच आवेश खानने कोहलीच्या समोर जोरात उड्या मारायला सुरुवात केली,आणि खुन्नस दिल्याचे दिसून आले ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप