अनेक वर्षांपर्यंत लीप घेत सुरू राहणाऱ्या रटाळ मालिकांऐवजी short and sweet मालिका तयार करण्याकडेही काही मराठी वाहिन्यांचा कल वाढलेला आहे. पहिल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊनच प्रोजेक्टची लांबी तेव्हाच कमी-जास्त करण्यात येते. बऱ्याचदा मालिकेला TRP कमी मिळाल्या मुळे त्या गुंडाळाव्या लागतात. तसेच काहीसे या मालिकेत ही झाले आहे! अनेक नामवंत कलाकार एकाच मालिकेत असूनही सोनी मराठीवरची अजूनही बरसात आहे ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड पुढच्या दोन दिवसात चित्रित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. आणि १२ मार्चला ही मालिका प्रेक्षकांचा अखेरचा निरोप घेईल, अशी माहिती मालिके मधीलच दिगग्ज कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांनी एका खास फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करून दिली.
View this post on Instagram
अजूनही बरसात आहे या मालिकेद्वारे उमेश आणि मुक्ता यांची लोकप्रिय जोडी अनेक वर्षांनी एकत्र काम करताना पाहायला मिळाली. आदिरा – अर्थात मीरा आणि आदिराज यांची जोडी त्यांच्या सर्व रसिक प्रेक्षकांना खूप आवडली होती. मराठी टेलिव्हिजनवर ही जोडी यावेळी प्रथमच एकत्र दिसली. मालिकेचा सुरुवातीच्या भागांना प्रतिसाद उत्तम मिळत होता. उमेश आणि मुक्ताचे स्वतःचे असे मोठे फॅन फॉलोइंग असल्याने ही मालिका अल्पावधीत महाराष्ट्राच्या घराघरात जात चर्चेचा विषय बनली. पण असे असले तरी कालांतराने चॅनेलला अपेक्षित TRP मिळाला नसावा किंवा ही सीरिअलच मुळात कमी कालावधीसाठी असावी, पण इतर लोकप्रिय मालिकांच्या तुलनेत या मालिकेने प्रेक्षकांचा लवकर निरोप घ्यायचं ठरवलं आहे.
मालिका अखेरच्या वळणावर असतानाच मीरा-आदिराज अर्थात मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या जोडीने सोनी मराठीच्या सोशल मीडिया हँडलवर LIVE येत लवकरच ही मालिका सगळ्यांचा निरोप घेत असल्याची माहिती दिली. उमेश-मीरा यांच्या व्यतिरिक्त मालिकेत राजन भिसे, विद्याधर जोशी, राजन ताम्हाणे, संहिता थत्ते, समिधा गुरू असे दिग्गज कलाकार दमदार भूमिका निभावताना दिसत आहेत.
ही मालिका १२ जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती या मालिकेत थोडी हटके अशी स्टोरी दाखवण्यात आलेली असल्याने प्रेक्षकांना ते आवडले. नेहमी सारखी प्रेम कहाणी पण तिला वयाची झालर लावली होती. आदिराज आणि मिरा हे दोन्ही वयाच्या चाळिशी मधले त्यांची प्रेम कहाणी दाखवली होती.
कॉलेजमध्ये प्रेमात असलेले दोघे काही क्षुल्लक कारणामुळे वेगळे होतात आणि वयाच्या तिशीनंतर एकमेकांना पुन्हा एकदा अचानकच भेटतात, असे काहिसे यातले कथानक होते. यात नायक-नायिका दोघेही डॉक्टर दाखवण्यात आले आहेत. चांगले कथानक, दिमतीला दिगग्ज कलाकार मंडळी असूनही ही मालिका प्रेक्षकांचा लवकर निरोप घेत आहे. १२ मार्चला या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रक्षेपित होईल.