भारतीय दिग्गज आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार एमएस धोनीने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून सात नंबरची जर्सी घातलेली दिसत आहे. ४० वर्षीय धोनीने नेहमीच सात क्रमांकाची जर्सी निवडली, मग तो भारताकडून खेळत असो किंवा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) असो. धोनीच्या या कामगिरीने अनेकांना प्रश्न पडला आहे की सात क्रमांकाचे रहस्य काय आहे?
इंडिया सीमेंट्स ने आयोजित केलेल्या संभाषणात, CSK कर्णधाराने त्याच्या जर्सी साठी सात क्रमांक निवडण्याचे नेमके कारण उघड केले आहे. ७ क्रमांकाची जर्सी फुटबॉल मध्ये खूप प्रसिद्ध होती, कारण ही जर्सी डेव्हिड बेकहॅम, राऊल आणि क्रिस्टियानो रोनाल्डो या सारख्या दिग्गज खेळाडूंनी परिधान केली होती, परंतु महेंद्रसिंग धोनीने हा नंबर क्रिकेट जगतात ही प्रसिद्ध केला आहे.
इंडिया सीमेंट्सशी व्हर्च्युअल संभाषणात धोनी म्हणाला, बर्याच लोकांना सुरुवातीला वाटले की सात हा माझ्यासाठी लकी नंबर आहे. मात्र, सुरुवातीला त्या मागे एक अतिशय साधे कारण होते. माझा जन्म जुलै च्या सातव्या दिवशी झाला होता. सातव्या महिन्याचा सातवा दिवस. हेच कारण होते की कोणता नंबर चांगला आहे त्या मध्ये जाण्याऐवजी मी माझी जन्मतारीख निवडली असे सांगितले.
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला, लोक मला जे सांगत होते ते मी आत्मसात केले आहे. जेव्हा इतर लोक मला विचारतात तेव्हा मी त्यानुसार उत्तर देतो. सात ही एक नैसर्गिक संख्या आहे. म्हणून मी माझ्या उत्तरात ते देखील जोडले. मी याबद्दल खूप अंधश्रद्धाळू नाही, परंतु हा माझ्या हृदयाच्या जवळचा हा नंबर आहे. म्हणून मी हा नंबर माझ्या जर्सी वर ठेवला आहे.
धोनी ने २००४ मध्ये बांगलादेश विरुद्ध ७ क्रमांका ची जर्सी घालून भारता कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. खेळाच्या इतिहासातील तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा हा दिग्गज क्रिकेटपटू एकमेव कर्णधार आहे. धोनीने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. आता एमएस धोनी आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.