चॉकलेट बॉय शिवम दुबे संपत्ती पाहून डोळे भरून येतील..!

CSK चा युवा डावखुरा फलंदाज शिवम दुबे याने टाटा IPL २०२२ मध्ये आता पर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध केली होती, ज्यात त्याने फक्त ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकार च्या मदतीने ९५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

शिवम दुबे हा त्याच्या आक्रमक फलंदाजी साठी ओळखला जातो. त्याच्यात अनेकदा युवराज सिंग ने खेळलेल्या शॉर्ट्स ची झलक पाहायला मिळते. या मोसमात त्याला चेन्नई सुपर किंग्जने मोठ्या रकमेत विकत घेतले होते. तेव्हा पासून तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. शिवम दुबेचा जन्म २६ जून १९९३ रोजी मुंबईतच झाला होता. त्याला लहान पणा पासून च क्रिकेट खेळण्याची आवड होती, पण आर्थिक अडचणी आणि वाढलेले वजन या मुळे तो आपल्या फिटनेस कडे लक्ष देत न्हवता. त्यामुळे त्याची क्रिकेट कारकीर्द १४ वर्षाचा होता तेव्हाच संपले होते.

View this post on Instagram

A post shared by shivam dube (@dubeshivam)

पण जेव्हा तो १९ वर्षांचा झाला, तेव्हा त्याने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याची मुंबई च्या २३ वर्षां खालील संघा साठी निवड झाली होती. शिवम दुबे ने १६ जुलै २०२१ रोजी त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानशी लग्न केले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याला एक मुलगाही झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज च्या संघा ने शिवम दुबेला लिलावात चार कोटी मध्ये विकत घेतले होते आणि आता पर्यंत त्याची कामगिरी पाहून योग्य असल्या चे सिद्ध होत आहे. त्याच्या एकूण संपत्ती बद्दल बोलायचे तर शिवम दुबे सुमारे २२ कोटींच्या मालमत्तेचा मालक असल्याचे सांगितले जाते.

७ डिसेंबर २०१७ रोजी त्याने २०१७-१८ रणजी ट्रॉफी मध्ये मुंबई साठी प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. पहिल्या डावात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये ५ बळी घेतले होते. २०१८-१९ रणजी ट्रॉफी मध्ये मुंबई च्या रेल्वे विरुद्ध च्या सामन्यात, त्याने २ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पहिले शतक झळकावले होते. कर्नाटक विरुद्ध च्या पुढच्या सामन्यात त्याने ५४ धावांत ५ बळी घेतले होते. १७ डिसेंबर २०१८ रोजी बडोद्या विरुद्ध च्या रणजी सामन्यात शिवम ने एका षटकात ५ षटकार मारले होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप