फिल्म इंडस्ट्री मधील अभिनेत्री, अभिनेता, त्यातील इतर कलाकार तसेच वेगवेगळ्या मालिका, नवनवीन सिनेमे या सर्वांबद्दलची माहिती घेण्यासाठी रसिक प्रेक्षक कायम उत्सुक असतात! एखादा सिनेमा जेव्हा येतो तेव्हा त्यातील हिरो- हिरोइन यांची चर्चा पिक्चर रिलीज झाल्यानंतरही खूप दिवस सर्वत्र गाजत असते. आपल्याला आवडणारा हा हिरो किंवा हिरोईन यांचं नेमक किती वर्षाचे आहेत त्यांचं वय काय त्यांचे शिक्षण वय काय? ते कुठं राहतात? त्यांचं शिक्षण किती झालंय? या बद्दल ची सगळी माहिती जाणून घेणे प्रेक्षकांना कायमच आवडत असते. या लेखात आम्ही तुम्हाला हीच माहिती सांगणार आहोत.
View this post on Instagram
बॉलिवूड प्रमाणेच साऊथमधील सुपरस्टार्सच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरातील सर्व प्रेक्षकांना लागलेली असते. आज आम्ही तुम्हाला साऊथमधील सुपरस्टार्स किती शिकलेले आहेत हे सांगणार आहोत.
गेल्या काही वर्षात साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सिनेमे आणि त्यातील सुपरस्टार यांची देशभरात चर्चा सुरू आहे. साऊथचे एकापेक्षा एक भारी सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘जयभीम’ आणि आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात साऊथमधील सुपरस्टारच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरातील प्रेक्षकांना लागली आहे. आज आम्ही तुम्हाला साऊथमधील सुपरस्टार्स किती शिकलेले आहेत हे सांगणार आहोत.
View this post on Instagram
अल्लू अर्जुन (Allu Arjun) – अल्लू अर्जुन हा साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेता आहे. त्याच्या ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर तर तो आणखीन लोकप्रिय झाला आहे. अल्लू अर्जुनच्या शिक्षणाबाबत सांगायचं तर चेन्नईमधून त्याने BBA म्हणजे बॅचरल ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे.
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) – विजय देवरकोंडा हा साऊथच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड, या सिनेमांमधून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला. त्याच्या ‘लीगर’ या आगामी सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. विजयने बी.कॉम पास केलं आहे.
धनुष (Dhanush) – साऊथचा सुपरस्टार धनुष हा त्याच्या ‘अतरंगी रे’ सिनेमामुळे आणि नुकत्याच झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. धनुषने १२वी चं शिक्षण घेतल्यावर फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. आणि नंतर त्याने डिस्टंन्स लर्निंगच्या माध्यमातून बॅचलर ऑफ कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं.
View this post on Instagram
नागा चैतन्य (Naga Chaitanya) – नागा चैतन्य हा सुद्धा साऊथमधील एक मोठा स्टार आहे. सध्या त्याच्या आणि समंथा रूथ हिच्या घटस्फोटामुळे दोघेही काही काळ चर्चेत होते.तो लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. तो आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमात दिसणार आहे. नागाने सुद्धा त्याचं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं आहे.
महेश बाबू (Mahesh Babu) – महेश बाबू हा साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. इंडस्ट्रीत आल्यापासून त्याने प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. महेश बाबू यानेही बी.कॉममधून ग्रॅज्यूएशन केलं आहे.
सूर्या (Suriya) – सूर्या हा त्याच्या ‘जयभीम’ सिनेमाच्या यशामुळे चांगलाच चर्चेत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतही आहे. सूर्याने चेन्नईमधून त्याचं बी.कॉम पूर्ण केलं.
View this post on Instagram
यश (Yash) – KGF स्टार यश, KGF च्या ब्लॉकबस्टर हिट मुळे यशची सोशल मीडियावरची फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली. याने १२वी पूर्ण केलं आणि त्यानंततर त्याने ड्रामा ग्रुप जॉइन केला. त्याने ड्रामाचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर आज तो साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.