शोएब मलिक वरील फिक्सिंगचे आरोप अखेर खरे, त्याला या संघातूनही हकालपट्टी केली तर आता तुरुंगवास भोगावा लागणार..?

 पाकिस्तान संघाचा स्टार खेळाडू शोएब मलिकने नुकताच सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. यानंतर तो प्रकाशझोतात आला. शोएब मलिकने 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले होते.

मात्र 14 वर्षांनंतर शोएब मलिकने सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याच वेळी, आता शोएब मलिक बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला. मात्र फिक्सिंगमुळे मलिकला आता पाकिस्तानात परतावे लागले आहे.

शोएब मलिकने केले फिक्सिंग: पाकिस्तानचा महान अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बरिसाल संघाकडून बीपीएलमध्ये खेळत होता. पण 22 जानेवारीला झालेल्या सामन्यात शोएब मलिकने एका षटकात तीन नो बॉल टाकले. त्यामुळे तो फिक्सिंगच्या कचाट्यात आला आहे. शोएब मलिकवर फिक्सिंगचे आरोप होत आहेत. यामुळे फॉर्च्युन बरिसालच्या मालकाने शोएब मलिकचा करार रद्द केला आहे. त्यामुळे तो आता या लीगचा भाग नाही.

शोएब मलिकला तुरुंगवास होऊ शकतो; फिक्सिंगमुळे पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना तुरुंगवास भोगावा लागला आहे. ज्यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचे. पण आता बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये  शोएब मलिकने लागोपाठ तीन नो बॉल टाकून सर्वांना चकित केले आहे. आता शोएब मलिकवर मोठी कारवाई होऊ शकते आणि लवकरच तपास सुरू होऊ शकतो. मलिक फिक्सिंगमध्ये पकडला गेला तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते आणि क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली जाऊ शकते.अलीकडेच त्याने तिसरे लग्न केले.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही आणि 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी तो जोरदार तयारी करत आहे. शोएब मलिकला 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी टीमचा भाग बनवण्यात आले नव्हते. अलीकडेच पाकिस्तान संघाचा खेळाडू शोएब मलिकने पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. सानिया मिर्झाशी घटस्फोट घेतल्यानंतर मलिकने हे लग्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top