KGF Chapter 2 साठी संजय दत्त आणि रवीना टंडन या दोघांनी फी ऐकून, डोळे पांढरे होतील..!

KGF Chapter 2: साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा पुढील महिन्यात येत्या १४ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रदर्शना पूर्वीच या चित्रपटाची जोरदार हवा झाली आहे. या बरोबरच या सिनेमातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा फिल्म इंडस्ट्री मध्ये होतेय.

नवनवीन धमाकेदार विषय घेऊन येणारे साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घालत राहतात. अगदी बॉलिवूडच्या सिनेमांनाही या बाबतीत हे सिनेमे टक्कर देतात. सुपरस्टार सूर्याचा ‘जयभीम’ सिनेमा, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ आणि हल्लीच प्रदर्शित झालेला रामचरण व ज्युनिअर एनटीआरचा ‘आरआरआर'” या सिनेमांनी बॉलिवूडलाअक्षरशः तोंडघशी पाडले. आता असाच धमाका करण्यासाठी आणखी एका साऊथ सुपरस्टारचा सिनेमा येतोय.

साऊथ सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ 2’ या चित्रपटाबद्दल. पुढील महिन्यात येत्या १४ तारखेला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अर्थात कोरोना महामारीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून लांबला. पण लवकरच आता प्रेक्षकांची प्रतीक्षा समाप्त होणार आहे. सध्यातरी सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचीही चर्चा जोरात रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by KGF Chapter 1 & 2 (@kgfmovie)

माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, साऊथ सुपरस्टार यशने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली आहे. ‘केजीएफ 2’साठी त्याने सुमारे २५ ते २७ कोटी फी घेतली आहे. चित्रपटात यशची हिरोईन बनलेली अभिनेत्री श्रीनिधी हिने या चित्रपटासाठी तब्बल ३ ते ४ कोटी मानधन घेतलं असल्याची चर्चा रंगली आहे.

या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकताना दिसणार आहेत. संजय दत्तने या सिनेमात अधीराची भूमिका निभावली आहे. संजयने या चित्रपटासाठी ९ ते १० कोटी मानधन घेतल्याचं वृत्त समजतंय. रवीना टंडन या चित्रपटात रमिका सेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने १- २ कोटी रूपये फी घेतल्याचं समजतंय.

साऊथ व हिंदी सिनेमात झळकलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज ‘केजीएफ चॅप्टर 2’ मध्ये विजयेंद्र इंगलागीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांनी यासाठी ८०.८२ लाख रूपये मानधन घेतल्याचे कळतंय. ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये मालविका अविनाश या अभिनेत्रीने एका न्यूज चॅनलच्या चीफ एडिटरची भूमिका आपल्या अभिनयाने जिवंत केली आहे. या रोलसाठी तिने ६० ते ६२ लाख रूपये घेतल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेते अनंत नाग यांनीही त्यांच्या भूमिकेसाठी ५० ते ५२ लाख रूपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘केजीएफ 2’साठी १५ ते २० कोटी फी आकारली असल्याचा दावा बातम्यांमध्ये करण्यात येतोय. ‘यामुळेच केजीएफ 2’ हा सर्वात महागडा कन्नड सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय. हा सिनेमा २०१८ साली रिलीज झालेल्या ‘केजीएफ- चॅप्टर 1’ चा सीक्वल आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप