दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ख्रिस मॉरिसने कसोटी क्रिकेट एकदिवसीय क्रिकेट, टी-२० क्रिकेट आणि लीग क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ख्रिस मॉरिस हा दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेट किंवा टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि गोलंदाजी तसेच फलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी बरेच सामने जिंकले आहेत. ख्रिस मॉरिस हा लीग क्रिकेटमधील मोठा चेहरा होता. मग ते आयपीएल असो, बिग बॅश लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि इतर सर्वत्र ख्रिस मॉरिसने चमकदार कामगिरी केली आणि त्याने आपल्या संघासाठी अनेक सामने जिंकले.
ख्रिस मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी सामने खेळले ज्यात त्याने फलंदाजीत १७३ धावा केल्या आणि गोलंदाजीत १३ बळी घेतले. याशिवाय त्याने ४२ एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्याने फलंदाजीत ४६८ धावा केल्या आणि गोलंदाजीत ४८ विकेट घेतल्या. त्याने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये २३ सामने खेळले आणि फलंदाजीत १३३ धावा केल्या आणि गोलंदाजीत ३४ बळी घेतले.
आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, ख्रिस मॉरिसने राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज संघासह विविध संघांसाठी ८१ आयपीएल सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने फलंदाजीत ६१८ धावा केल्या आणि गोलंदाजीत ९५बळी घेतले. ख्रिस मॉरिसला दक्षिण आफ्रिकेकडून फारसे सामने खेळता आले नसले तरी मिळालेल्या संधींमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. ख्रिस मॉरिसनेही आयपीएलमध्ये काही संस्मरणीय कामगिरी केली आहे, जी लोक कधीही विसरू शकत नाहीत.
ख्रिस मॉरिस आता कोचिंग करणार आहे आणि वेगवेगळ्या लीगमध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडण्यास उत्सुक आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिकेच्या टायटन्स संघाशी संबंधित आहे. आता ख्रिस मॉरिसला आयपीएलमधील कोचिंग स्टाफमध्ये संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आपल्या फॅमिली साठी टाईम मिळावा म्हणून ख्रिस हा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने वयाच्या ३४ व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ख्रिस मॉरिस हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ख्रिस मॉरिसने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर निवृत्तीची घोषणा केली. ख्रिस मॉरिसने इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी छोटी-मोठी भूमिका बजावली त्या सर्वांचे मी आभार मानतो.