भारताचा माजी कर्णधार विराट कोहली चा IPL २०२२ मध्ये फ्लॉप शो सुरूच आहे. शनिवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध च्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. अशा प्रकारे कोहली सलग दोन सामन्या मध्ये गोल्डन डकचा बळी ठरला आहे. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ने कोहली बाबत मोठे वक्तव्य केले आहे. माजी कर्णधार म्हणाला की कोहलीला विश्रांती ची गरज आहे. तो म्हणाला की, कोहली ने जास्त क्रिकेट खेळले आहे. सतत आयपीएल खेळल्या मुळे कोहली चा फूट वर्क मंद झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला २ किंवा ३ सामन्या साठी विश्रांती ची गरज आहे. या मुळे त्याला ताजे तवाने होण्या ची संधी मिळेल.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन असे मानतो की, विराट कोहलीत अजून ही ६-७ वर्षां चे क्रिकेट बाकी आहे. अशा स्थितीत कोहली ला अडचणीत न येण्याची काळजी भारतीय संघाला घ्यावी लागणार आहे. तो म्हणाला की, चाहत्या च्या अपेक्षां वर खंबीर पणे उभे राहणे आणि इतर जबाबदाऱ्या मुळे कोहली चे मन आधीच खूप थकले आहे. त्या मुळे इंग्लंड दौऱ्या पूर्वी विराट कोहलीला विश्रांती देण्यात यावी असे माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीन ला वाटते.
View this post on Instagram
आयपीएल २०२२ मध्ये विराट कोहली ने आता पर्यंत ८ सामने खेळले आहेत, या ८ सामन्या मध्ये त्याने केवळ ११९ धावा केल्या आहेत. या दरम्यान भारता च्या माजी कर्णधारा ची सरासरी १७ झाली आहे. खराब फॉर्म शी झुंज देत असलेल्या कोहली ला २ सामन्या व्यतिरिक्त उर्वरित ६ सामन्या मध्ये २० चा आकडा ही गाठता आलेला नाही. शनिवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध च्या सामन्यात कोहली च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) ९ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा संघ केवळ ६८ धावा करू शकला होता. सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने केवळ ८ ओव्हर मध्ये १ गडी गमावून विजय मिळवला होता. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा संघ १० गुणा सह गुणतालिकेत चौथ्या क्रमांका वर आहे.