माजी निवडकर्त्याने केला खुलासा, रोहित शर्मा या कारणामुळे २०११ चा विश्वचषक खेळू शकला नाही..!

आयसीसी विश्वचषक २०११ संपून १० वर्षे झाली आहेत. भारतीय उप- महाद्वीप मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या १० व्या आवृत्तीत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत विश्वविजेते पदावर नाव कोरले होते. पण आणखी एक गोष्ट चाहत्यांच्या समोर आली आहे.

ज्या वेळी भारतीय संघाची विश्वचषका साठी निवड केली जात होती, त्यावेळी कृष्णमाचारी श्रीकांत हा भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता होता. श्रीकांत च्या या निवड समितीचा भाग असलेल्या राजा वेंकटने २०११ च्या विश्वचषका साठी निवडले ल्या संघात रोहित शर्मा बाबत मोठा खुलासा केला आहे.

खरे तर त्यावेळी भारतीय संघाच्या निवड समितीचा भाग असलेले राजा वेंकट याने २०११ च्या विश्वचषका साठी संघ निवडी बद्दल सांगितले की, प्रथम आपण संघातील सर्वात तेजस्वी आणि स्फोटक फलंदाज रोहितची निवड केली पाहिजे. मात्र व्यवस्थापनाच्या मध्यस्थी नंतर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला स्थान देण्यात आले होते.

याशिवाय, श्रीकांतच्या निवड समितीने रोहित शर्माकडे कसे दुर्लक्ष केले आणि त्याच्या जागी लेगस्पिनर पियुष चावलाची निवड का करण्यात आली हे देखील व्यंकटने सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर माजी निवडक राजा वेंकट याने एका वृत्तपत्राशी मनमोकळेपणाने संवाद साधला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर बोलताना राजा व्यंकट म्हणाला की, संघ निवडणे हे अवघड काम नव्हते कारण आमच्याकडे आधीच योजना होती. त्या वेळी आधी खेळत असताना संघ जवळपास सारखाच होता. १४ खेळाडू पूर्णपणे ठरले होते. पण १५ वा खेळाडू म्हणून आम्हाला रोहित शर्मा हवा होता.

पण संघ व्यवस्थापनाला पियुष चावला हवा होता हे दुर्दैवी होते. रोहित आता च्या प्रमाणेच एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू होता. त्याच्या कडे प्रतिभे ची कमतरता नव्हती आणि निवडकर्त्यांचा ही पूर्ण आत्मविश्वास होता. पण व्यवस्थापनाला चावला हवा होता म्हणून आम्ही ते मान्य केले. रोहित शर्मा आणि पियुष चावलाच्या या मुद्द्यावर राजा वेंकट व्यतिरिक्त, त्याचे सहकारी निवडकर्ता सुरेंद्र भावे म्हणाला की, खरं तर, त्यावेळी आम्हाला लेग स्पिनरची गरज होती. पियुषही तंदुरुस्त होता आणि फलंदाजीत काही प्रमाणात हातभार लावत होता. याशिवाय गुगलीसाठीही तो आमच्या साठी चांगला पर्याय होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप