उन्मुक्त चंदपासून ते अँडरसनपर्यंत, असा आहे नवीन अमेरिकन क्रिकेट संघ..!

अलीकडच्या काळात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली आणि ते अमेरिके साठी खेळायला गेले आहेत. त्यात भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंद च्या नावाचा ही समावेश आहे, ज्याने नुकतीच आपल्या कारकिर्दी तून निवृत्ती घेतली आणि यूएस संघा कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी न्यूझीलंड चा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन सारखे सर्वोत्तम खेळाडू ही या यादीत आहेत, जे अमेरिके कडून खेळताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका आता आपला मजबूत क्रिकेट संघ तयार करू शकते. आज या लेखात आपण अमेरिके ची प्लेइंग इलेव्हन बद्दल चर्चा करणार आहोत.

यूएस क्रिकेट संघातील पहिल्या सलामीवीरा बद्दल बोलायचे झाले तर, सलामीच्या फलंदाजांच्या जोडी मध्ये सनी सोहल आणि उन्मुक्त चंद आहेत. हे दोघेही भारतीय खेळाडू आहेत, जरी दोघांनाही भारतीय संघात संधी मिळाली नाही, पण त्यांना आयपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. दुसरीकडे, मधल्या फळीकडे नजर टाकल्यास तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा समी अस्लम आणि चौथ्या क्रमांका वर भारताचा यष्टिरक्षक फलंदाज समित पटेल आहे.

View this post on Instagram

A post shared by Unmukt Chand (@unmuktchand_official)

अमेरिके च्या या संघात पाचव्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून श्रीलंके च्या शेहान जयसूर्याचा समावेश आहे. तर न्यूझीलंड चा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनला अष्टपैलू म्हणून सहावे स्थान दिले जाऊ शकते. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा इयान हॉलंड आणि डेन पिएड आठव्या स्थानावर आहेत. याशिवाय जुआन थेरॉन आणि सिद्धार्थ त्रिवेदीही गोलंदाजी साठी उपस्थित आहेत.

उन्मुक्त चंदची कामगिरी पाहता या फलंदाजाने ६७ प्रथम श्रेणी सामन्या मध्ये ८ शतके आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने ३३७९ धावा केल्या आहेत, तर १२० लिस्ट- ए सामन्या मध्ये ४५०५ धावा केल्या आहेत. उन्मुक्त च्या नावावर लिस्ट- ए मध्ये ७ शतके आणि ३२ अर्धशतक आहेत. त्याच बरोबर ७७ टी-२० सामन्या मध्ये ३ शतके आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने त्याने १५६५ धावा केल्या आहेत.

सनी सोहल, उन्मुक्त चंद, सामी अस्लम, स्मित पटेल, शेहान जयसूर्या, कोरी अँडरसन, इयान हॉलंड, डेन पिएड, कॅमेरॉन स्टीव्हनसन, जुआन थेरॉन आणि सिद्धार्थ त्रिवेदी. या खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप