गौतम गंभीर खासदार असून सुद्धा का IPL चा भाग होता, यावरती जे उत्तर भेटले ते खूपच मन हेलावणारे होते..!

गौतम गंभीर हा भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू पैकी एक आहे आणि त्याच्या प्रामाणिक पणा साठी जगभरात त्याची ओळख आहे. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्या नंतर गौतम गंभीर ने राजकारणात पाऊल ठेवले आणि तो तिथेही खूप चांगले काम करत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान, जेव्हा गंभीरला विचारण्यात आले की, सध्या तुम्ही सक्रिय राजकारणी आहात आणि तरीही तुम्ही आयपीएल 2022 मध्ये भाग घेतला होता, तेव्हा गंभीर ने त्याच्याच शैलीत उत्तर दिले.

आम्ही तुम्हाला सांगतो की गौतम गंभीर हा भारतीय जनता पक्षाशी दीर्घ काळा पासून संबंधित आहे आणि तो पूर्व दिल्लीचा खासदार आहे. गंभीर ‘जन रसोई’ नावा ने स्वतःचे जेवणघरही चालवतो. या जेवण घर अंतर्गत गरीब आणि निराधार लोकांना फक्त १ रुपयात जेवण दिले जाते. समाजातील भूक आणि कुपोषण दूर करण्या साठी ‘एक आशा जन रसोई’ या मोहिमेअंतर्गत या जेवण घराची स्थापना करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Gambhir (@gautamgambhir55)

इतकेच नाही तर गंभीर ने तेथे लायब्ररीचीही चांगली व्यवस्था केली आहे. जेव्हा गंभीरला विचारण्यात आले की, सक्रिय राजकारणी असूनही तुम्ही आयपीएल २०२२ मध्ये प्रशिक्षक आहात. यावर गंभीर म्हणाला की, त्याला पैशांची गरज आहे. तो प्रामाणिकपणे कमावतो आणि लोकांच्या सेवेत घालतो.

पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाला की सार्वजनिक जेवणघर चालवण्या साठी पैसे लागतात आणि त्या साठी मला काम करावे लागेल. ५ हजार लोकांना महिनाभर जेवण देण्या साठी २५ लाखांचा खर्च येतो. एका वर्षा साठी २.७५ कोटी रुपये खर्च करायला लागतात. जन रसोई ही खासदार कोट्यातून बनवली जात नाही. लोकांना खायला आणि वाचनालय बांधायला पैसे लागतात. यासाठी मला कमवावे लागेल, मी आयपीएल मध्ये काम करतो किंवा कॉमेंट्री करतो हे सांगायला मला लाज वाटत नाही.

गौतम गंभीर गेल्या काही सिजन पासून आयपीएल मध्ये कमेंट्री करत होता परंतु यावर्षी त्याची लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) चा मार्गदर्शक म्हणून निवड झाली आणि त्याने त्याचे काम चोख बजावले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, एलएसजीचा हा पहिला सीझन होता आणि ते त्यांच्या पहिल्याच सीझन मध्ये प्लेऑफ मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप