दिनेश कार्तिकवर टीका करणे गौतम गंभीरला पडले भारी, सुनील गावस्कर कडून ऐकावे लागले..!

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने म्हटले आहे की, आगामी T-२० विश्वचषक २०२२ साठी दिनेश कार्तिकचा प्लेइंग इलेव्हन मध्ये समावेश न केल्यास त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात काहीच अर्थ नाही. ज्यावर माजी सलामीवीरा वर टीका करताना भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाला की, दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळेल की नाही हे आम्ही ठरवू.

तो असेही म्हणाला की अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज हा एक अनुभवी खेळाडू आहे ज्याला भारता कडून खेळताना पाहायचे आहे. सुनील गावसकरने आश्चर्य व्यक्त केले की कोणी खेळाडू खेळणार की नाही खेळणार हे चान्स कसे ठरवू शकतात. या महान फलंदाजाने सांगिलते की, खेळाडूंची प्रतिष्ठा आणि मोठ्या नावाच्या आधारे निवड न करता त्यांच्या फॉर्म च्या आधारा वर केली पाहिजे. कार्तिक सहाव्या किंवा सातव्या क्रमांका वर फलंदाजी करत असल्याने त्याच्या कडून नियमितपणे अर्धशतकाची अपेक्षा करू नये असेही तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्स वर म्हणाला, मला माहित आहे की लोक बोलत आहेत की जेव्हा दिनेश कार्तिक भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही तर तुम्ही त्याला संघात कसे समाविष्ट करू शकता. लोकांच्या अशा कमेंट्सचे मला आश्चर्य वाटते आणि कार्तिकला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळणार नाही असे कसे म्हणता? तो एक असा फलंदाज आहे ज्याला भारतीय संघ आणि जनतेला त्याला संघात पाहायला आवडेल. तुम्ही खेळाडूंची निवड त्याच्या फॉर्म च्या आधारा वर करावी, मोठे नाव आणि प्रतिष्ठते वर नव्हे.

आपल्या सर्वांना माहित आहे की दिनेश कार्तिकला जास्त संधी मिळत नाहीत आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा तो ६ आणि ७ व्या क्रमांका वर फलंदाजी करतो. त्यामुळे तुम्ही त्याच्या कडून नियमितपणे ५० धावा करण्याची अपेक्षा करू शकत नाही. तो तुम्हाला २० चेंडूत ४० धावा मिळवून देईल आणि तेच तो सातत्याने करत आहे. या कामगिरी मुळे तो २०२२ च्या टी-२० विश्वचषका साठी टीम इंडिया मध्ये स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे. माझे मत आहे की तुम्ही खेळाडूचा दर्जा आणि वय बघू नका, त्याची कामगिरी बघा आणि मग तुमचे मत द्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप