आयपीएल मध्ये देश- विदेशातील खेळाडू एकाच संघा साठी मैदानात खांद्याला खांदा लावून खेळताना दिसतात. त्याचप्रमाणे आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या संघात विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल हे गेल्या २ हंगामात एकत्र खेळत आहेत, हे दोघेही एकजुटीने आपल्या संघाला विजय मिळवून देण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
ग्लेन मॅक्सवेल ने गेल्या वर्षी विराट कोहली च्या नेतृत्वाखाली अनेक सामने जिंकले आणि जबरदस्त कामगिरी केली होती, पण या मोसमात आता ग्लेन मॅक्सवेलने विराट कोहली सोबत खेळण्यास नकार दिला आहे. ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सोबत फलंदाजी करायची नाही. ग्लेन मॅक्सवेल ने स्वतः एका व्हिडिओ मध्ये हे सांगितले आहे जो खूप व्हायरल झाला होता.
RCB v CSK, Dressing Room Celebrations
The smiles and laughter returned & the players celebrated the win with the customary victory song. We also asked Maxi, Harshal, Siraj and the coaches about last night’s win against CSK.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/uW5hl7b4ko
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 5, 2022
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅक्सवेल- कोहली यांच्यात असे काय घडले की ग्लेन मॅक्सवेल ने विराट कोहली सोबत फलंदाजी करण्यास नकार दिला असेल. मॅक्सवेल ने विराट सोबत फलंदाजी करण्यास नक्कीच नकार दिला, पण गमतीशीरपणे. त्याचं झालं असं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला होता. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल पिच वर आला तेव्हा विराट कोहलीने त्याला धावबाद केले. मॅक्सवेल केवळ ३ धावा करून धावबाद झाला. या सामन्यात आरसीबी ने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. सामना संपल्या नंतर जेव्हा संघ ड्रेसिंग रूम मध्ये गेला तेव्हा विराट कोहली समोर ग्लेन मॅक्सवेलला हे म्हणताना ऐकले की विराट कोहली सोबत फलंदाजी करू शकत नाही.
आरसीबीच्या अधिकृत वेबसाइट वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्या मध्ये मॅक्सवेल त्याचा सहकारी खेळाडू विराट कोहलीला सांगत आहे की, मी तुझ्या सोबत फलंदाजी करू शकत नाही, तू खूप वेगाने धावतोस. तू एक आणि दोन धावा घेऊ इच्छितो, पण मी या रणनीतीचा फार मोठा चाहता नाही. ग्लेन मॅक्सवेल ने हा सगळा प्रकार विराट कोहलीला मजेशीरपणे सांगितला होता.