IPL चाहत्यांसाठी खूशखबर..! यंदाच्या सीज़न मध्ये होणार क्लोजिंग सेरेमनी, बीसीसीआयने जारी केले टेंडर..!

क्रिकेट चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना महामारीच्या आगमना नंतर प्रथमच इंडियन प्रीमियर लीग मध्ये समारंभ आयोजित केला जाणार आहे. या मोसमाचा समारोप सोहळा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डा ने या साठी निविदा ही जारी केली आहे.

सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२२) मध्ये समारोप समारंभ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) करायचा आहे. चार वर्षां नंतर या स्पर्धेचा समारोप सोहळा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सुपर शो साठी बीसीसीआय ने निविदा मागवल्या आहेत. सर्वाधिक बोली लावणारा हा मुख्य प्रायोजक असेल. समारोप समारंभ आयोजित करण्या साठी मंडळा ने शनिवारी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) जारी केल्याची घोषणा केली आहे. IPL 2022 च्या शेवटी समारोप समारंभ होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या साठी निविदाही जारी केली आहे.

या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) मध्ये निविदा च्या तपशीलवार अटी आणि शर्ती समाविष्ट केल्या आहेत. पात्रता आवश्यकता, बिड सबमिशन प्रक्रिया आणि अधिकार यात सामील आहेत. हा रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) रुपये एक लाख भरल्या नंतर उपलब्ध होईल (त्यात वस्तू आणि सेवा कर देखील समाविष्ट असेल) जो नॉन रिफंडेबल असणार आहे. रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) २५ एप्रिल पर्यंत खरेदी करता येणार आहे.

बीसीसीआय ने एका प्रकाशनात म्हटले आहे की, बिड सबमिट करण्यास इच्छुक असलेल्या पक्षा ने आरएफपी खरेदी करणे आवश्यक आहे. जे RFP च्या पात्रता निकषांची पूर्तता करतात तेच बोली साठी पात्र असतील. IPL २६ मार्च रोजी सुरू झाला आहे आणि हा २९ मे रोजी संपणार आहे.

२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ जवान शहीद झाल्या बद्दल आयपीएल चा समारोप सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. २०२० मध्ये कोरोना ने दार ठोठावले आणि पुढच्या वर्षीही भीती च्या छाये खाली ही स्पर्धा भारता बाहेर नेण्यात आली होती. आता २०१८ नंतर पहिल्यांदाच चाहत्यांना २०२२ मध्ये हे मनोरंजन पाहायला मिळणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप