पंत साठी आनंदाची बातमी, डेव्हिड वॉर्नर आणि एनरिक नॉर्किया खेळू शकतात पुढील सामना..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मोसमात विजयासह खाते उघडणाऱ्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) ने त्यांचा दुसरा सामना गमावला आहे. शनिवारी गुजरात टायटन्सने (GT) या संघाचा 14 धावांनी पराभव केला होता. यादरम्यान, दिल्ली संघा साठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्केआ पुढील सामन्यात पुनरागमन करू शकतात, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने म्हटले आहे. हे दोन्ही खेळाडू दिल्ली संघाच्या तिसऱ्या सामन्यात खेळू शकतात.

गुजरात कडून सामना हरल्या नंतर पॉन्टिंगने सांगितले की, नॉर्कियाने सकाळच्या सराव सामन्यात १००% गोलंदाजी केली आहे. मला विश्वास आहे की तो १००% क्षमतेने ४ किंवा ५ षटकांचा स्पेल करू शकतो. मला वाटते की जर त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट मधून मंजुरी मिळाली तर त्याने खेळावे. पुढच्या सामन्या साठी आमच्याकडे अजून काही दिवस आहेत, त्यामुळे पुढच्या सामन्यात तो निवडी साठी उपलब्ध होईल अशी आशा आहे.

डेव्हिड वॉर्नर बाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग म्हणाला की, वॉर्नर पाकिस्तान दौरा संपवून मुंबईत पोहोचला आहे. मिचेल मार्श काही दिवसा पासून मुंबईत क्वारंटाईन मध्ये आहे. मार्श रविवारी त्याचे क्वारंटाईन पूर्ण करेल. त्यामुळे KKR विरुद्ध च्या १० व्या सामन्यात मार्श उपलब्ध असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

एनरिक नॉर्किया त्याच्या पाठीच्या आणि हिपच्या दुखापतीशी झुंज देत आहे. मात्र, तो आता पूर्ण- पणे बरा झाला आहे आणि त्याच्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. नोर्कियाने गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून क्रिकेट खेळलेले नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शला ही दुखापती मुळे पाकिस्तान दौऱ्यातून मुकावे लागले होते. आता तो देखील ठीक झाला आहे. वॉर्नर पाकिस्तान दौरा संपवून मुंबईत पोहोचला आहे.

दिल्ली कॅपिटल्स ने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स चा ४ विकेट्सने पराभव केला होता. तर आता दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा म्हणजेच तिसरा सामना लखनौ सुपर जायंट्स (एल एस जी) विरुद्ध होणार आहे. हा सामना ७ एप्रिल रोजी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप