हार्दिक पंड्याच्या नेतृत्वा खाली गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थाना वर आहे. आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्स ने पहिल्याच मोसमात चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या च्या नेतृत्वा खाली जीटी संघ आपल्या ११ सामन्या नंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थाना वर विराजमान झाला आहे. पण मेगा लिलावा दरम्यान फ्रँचायझी ने अशाच काही खेळाडू वर पैज लावली जी त्यांना चांगलीच महागात पडली आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ३ खेळाडूंची नावे सांगणार आहोत ज्यांना खरेदी करून गुजरात टायटन्स संघाने मोठी चूक केली आहे.
वरुण एरोन: यंदा च्या मोसमात वरुण एरोनला केवळ २ सामन्यां मध्ये भाग घेण्याची संधी देण्यात आली होती. मेगा लिलावात विकत घेतलेल्या ५० लाखांच्या गोलंदाजा ने गुजरात साठी दोन सामन्यांत फक्त दोन विकेट घेतल्या ज्या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट १०.४० होता. या मुळेच त्याला नंतर संघातून वगळण्यात आले होते.
View this post on Instagram
मैथ्यू वेड: टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या फायनलचा हिरो मॅथ्यू वेडला गुजरात टायटन्स संघाने २.४० कोटी रुपयांना खरेदी केले होते. आयपीएल २०२२ मध्ये वेड ने गुजरात कडून ५ मॅच मध्ये ओपनिंग केली, पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. खरे तर या ५ सामन्यात वेड ने १३.६० च्या खराब सरासरीने फक्त ६८ धावा केल्या आहेत तर त्याचा स्ट्राईक रेट फक्त १०७.९४ इतका होता. याच कारणा मुळे रिद्धिमान साहाला डावलून त्याला सलामीची जबाबदारी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्स ने वेडला विकत घेऊन चूक केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
विजय शंकर: ३D खेळाडू विजय शंकर आयपीएल २०२२ मध्ये वाईट रित्या फ्लॉप झाला आहे. गुजरात ने शंकरला १.४ कोटीं मध्ये विकत घेतले होते, त्यानंतर त्याला ४ सामन्या मध्ये संधी देण्यात आली होती, त्यादरम्यान शंकर चा स्ट्राइक रेट ५४.२९ आणि सरासरी ४.७५ होती. शंकर च्या बॅट मधून गुजरात टायटन्स साठी केवळ १९ धावा आल्या आहेत. ही आकडे वारी पाहता गुजरात टायटन्स ने मेगा लिलावात शंकरला विकत घेऊन मोठी चूक केली आहे.