नुकतीच IPL समाप्त झाली आहे. त्यात गुजरात टायटन्सने धमक्यात विजेते पद पटकावले आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावल्यापासून लोकांनी हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक केले आहे. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत होते कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरले होते. यातूनच पहिल्याच वर्षी गुजरात टायटन्सने धमक्यात विजेते पद पटकावले आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
चला तर मग जाणून घेऊ हार्दिक पंड्या कर्णधार होऊ शकतो याची तीन मोठी कारणे.
1. स्वतःसाठी जबाबदारी घेणे: आयपीएल २०२२ दरम्यान, गुजरात टायटन्सचा संघ जेव्हा-जेव्हा अडचणीत आला तेव्हा हार्दिक पांड्याने बॉल, बॅट किंवा क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. हार्दिक पांड्या नेहमीच आपल्या संघाचे नेतृत्व करताना दिसला. अशा परिस्थितीत हार्दिकला भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली तर तो कठीण काळातही संघाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो.
2. कर्णधार झाल्यानंतर हार्दिक चा खेळ बहरला गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय होता. भारतीय टी-२० संघात हार्दिक किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याने सातत्याने धाव करत रहाणे फार गरजेचे होते आणि त्याने ते वेळ तेली तेव्हा करून दाखवले.
.हार्दिक पांड्याकडे आयपीएल संघाची जबाबदारी देण्यात आल्यापासून त्याचा खेळ खूप बहरला आहे. तो आता अधिक जबाबदारी घेत खेळताना दिसत होता. कर्णधारामुळे त्याचा खेळ वाढला तर त्याला कर्णधार बनवणे हा चांगला निर्णय ठरू शकतो. हार्दिकने त्याच्या मागील सर्व आयपीएल हंगामांपेक्षा या हंगामात जास्त धावा केल्या. तसेच त्याने गोलंदाजीने सुद्धा ८ विकेट्स घेतल्या आहेत.
View this post on Instagram
3. योग्य वेळी योग्य खेळाडू वापरणे : हार्दिक पांड्याने संपूर्ण आयपीएलमध्ये प्रत्येक वेळी योग्य खेळाडूचा वापर केला आहे, मग तो गोलंदाजी असो किंवा फलंदाजीचा क्रम, प्रत्येक वेळी त्याने विरोधी संघावर दबाव ठेवला, यामुळेच गुजरात संघ केवळ टेबल टॉपर्स नाही. पण आयपीएल विजेता देखील आहे.