उमरान मलिकला श्रीलंकन खेळाडूंकडून मार पडत असताना हार्दिक पंड्याने केले असे की पाहून सगळेच झाले थक्क

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या वेगवान गोलंदाज उमरान मलिकला प्रोत्साहन देताना दिसला आणि तेही त्याला श्रीलसन्केच्या खेळाडूकडून मार बसत असताना.

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ३९.४ षटकांत २१५ धावांत आटोपला.

भारत आणि श्रीलंका  यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात, वेगवान गोलंदाज उमरान मलिक १२ व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याची सुरुवात खूपच खराब झाली. १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुसलने एकच धाव घेतली. यानंतर नुवानिडूने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन चौकार लगावले. चौथ्या चेंडूवर नुवानिडूने एक धाव श्रीलंकेच्या झोळीत टाकली. मेंडिसने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला.

त्याचवेळी सहाव्या चेंडूवर एकही धाव आली नाही. म्हणजे उमरानने एका षटकात १४ धावा दिल्या. एकीकडे सर्वांची निराशा झाली असताना दुसरीकडे हार्दिक पंड्याने वरिष्ठ खेळाडू आणि उपकर्णधार म्हणून मलिकचे घसरलेले मनोबल वाढवले. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप