इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२२) मध्ये दोन नवीन संघ प्रवेश करणार आहेत. लखनौ आणि अहमदाबादच्या संघांनी आयपीएल मेगा लिलावापूर्वी ३-३ खेळाडू संघात सामील केले आहेत. अहमदाबादने स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला कर्णधारपदी नियुक्त केले आहे. यावर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
IPL २०२२ साठी रिटेन्शन पूर्ण केल्यानंतर, IPL २०२२ मेगा लिलावापूर्वी, नवीन संघांनी खूप पैसा खर्च करून नियमांनुसार ३-३ खेळाडू जोडले आहेत. अहमदाबादने हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांचा समावेश केला आहे. फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला १५ कोटी, अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खानला १५ कोटी आणि भारतीय सलामीवीर शुभमन गिलला ८ कोटी दिले आहेत. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्याने खूप आनंद झाला आहे. अष्टपैलू खेळाडूने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.
अहमदाबाद फ्रँचायझीचा कर्णधार बनल्यानंतर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून संघ मालकाचे आभार मानले आहेत. हार्दिक व्हिडिओ मध्ये म्हणाला की, हॅलो अहमदाबाद, नवीन आयपीएल टीम अहमदाबादमध्ये नवीन प्रवास सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहे. कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी संघ मालक आणि व्यवस्थापनाचे आभार मानू इच्छितो. हे एक नवीन युग आहे आणि मी त्याची वाट पाहत आहे. मी तुम्हाला वचन देतो की हा संघ नेहमी लढेल आणि शेवटपर्यंत चांगली कामगिरी करेन. शुभमन गिल आणि राशिद खान या दोन खेळाडूना मी चांगले ओळखतो आणि ते संघासाठी चांगली कामगिरी करतील.
आम्ही तुम्हाला सांगतो की (IPL २०२१) चा १४ वा सीझन हार्दिक पांड्यासाठी चांगला ठरला नाही. आयपीएल २०२१ मध्ये, त्याच्या बॅटमधून फक्त १२७ धावा आल्या, तर संपूर्ण हंगामात तो गोलंदाजीपासून दूर राहिला. हार्दिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ९२ सामने खेळले असून त्यात १४७६ धावा केल्या आहेत तसेच ४२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार अर्धशतकेही झळकली आहेत.
IPL २०२२ साठी मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सूर्य कुमार यादव यांना कायम ठेवले आहे. त्याचबरोबर कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डलाही फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. चार खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर, मुंबई इंडियन्स ४८ कोटी रुपयां बरोबर आगामी मेगा लिलावात जाणार आहे.