रोहित ची उचलबांगडी होऊन आता हार्दिक पांड्या बनू शकतो भारतीय संघाचा नवा कर्णधार- बीसीसीआय..!

हार्दिक पांड्या बनणार भारताचा नवा कर्णधार! IPL २०२२ मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा हार्दिक आता भारतीय आंतरराष्ट्रीय संघा चे कर्णधार पद भुशावू शकतो! हार्दिक कर्णधार झाला तर तुम्हाला वाटेल की बाकी सर्व सर्व वरिष्ठ कशा साठी आहेत? त्यामुळे तसे नसून सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआय ने घेतला आहे.

१ जुलै रोजी खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड विरुद्ध च्या उर्वरित कसोटी सामन्या साठी भारतीय संघ लवकरच सरावा साठी मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिके सोबत ९ जून पासून सुरू होणाऱ्या मालिकेत ५ अ श्रेणीतील खेळाडूंना काही दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. जेणे करून ते मासिक दृष्टीने तयार होतील. यात नवीन कर्णधार रोहित शर्मा, के एल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिके विरुद्ध ९ मे पासून सुरू होणाऱ्या मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार पद भुशावेल असे त्याच्या IPL मधील कामगिरी वरून वाटत आहे. बीसीसीआय ने त्याच्या वर विश्वास ठेवून त्याला कर्णधार पदाची संधी दिली तर तो चांगली कामगिरी करेल. या मालिकेत ५ टी-२० सामने होणार आहेत. पहिला सामना नवी दिल्ली आणि त्यानंतर कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाचे कर्णधार पद शिखर धवनला ही दिले जाऊ शकते, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. अनेक नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. मोहसीन खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्या नावांचा वारंवार उल्लेख केला जात आहे. तसेच टिळक वर्मा, आयुष बडोनी या नवोदित खेळाडूंना पूर्ण संधी दिली जाऊ शकते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप