प्रसिद्ध मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून झळकत घराघरात जाऊन पोहोचला आहे. संकर्षण याने आतापर्यंत अनेक मालिका आणि टीव्ही शो मधून आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांवर जादू केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसह तो किचन कल्लाकार या शोच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो.
View this post on Instagram
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये संकर्षण समीर नावाच्या पात्राच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. समीर हा यशचा मित्र असतो आणि त्याला त्याच्या प्रत्येक बाबतीमध्ये मदत करत असतो. त्याचप्रमाणे नेहा हिला देखील तो मदत करताना आपल्याला पाहायला मिळतो. संकर्षण कऱ्हाडे हा मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे.
संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना नेहमीच वेगवेगळे अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वी संकर्षण याचे एक नाटक देखील लोकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकामध्ये तो अतिशय जबरदस्त भूमिका निभावताना आपल्याला दिसला आहे.
नाटक, मालिका, लेखन, कविता या क्षेत्रात त्याने आपली कसब दाखवली आहे. संकर्षण नुकतच एका नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हे क्षेत्र मनोरंजन विश्वाशी निगडित आहे. त्याच्या या नवीन प्रवासाबद्दल कलाकारांसह चाहत्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
किचन कल्लाकार या शोमध्ये संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करताना दिसतो तर प्रशांत दामले परिक्षकाची बाजू सांभाळताना दिसतात.
इथेच संकर्षणने आपल्या प्रोजेक्टबाबत प्रशांत दामले यांना सांगितले. प्रशांत दामले यांनी लगेचच होकार कळवल्यावर या नाटकाचा ‘तूच डायरेक्टर..’ असा शिक्कामोर्तब केला. या नाटकासाठी वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले हे देखील तितकेच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. नाटकाच्या संगीताची धुरा अशोक पत्की यांनी सांभाळली असल्याने ते उत्कृष्टच होणार याची खात्री आहे. या नाटकातून संकर्षण कऱ्हाडे प्रथमच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नाटकासाठी तोही उत्सुक आहे.
View this post on Instagram
आता संकर्षणच्या बायकोबाबतचे एक वृत्त सोशल मीडियावर सध्या जोरात व्हायरल झालेले पहायला मिळत आहे. संकर्षणच्या पत्नीचे नाव शलाका पांडे असे असून शलाका आणि संकर्षण आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर दोघांचे अनेक फोटो शेअर करत असतात. या दोघांच्या परिवारामध्ये काही महिन्यांपूर्वीच दोन गोंडस मुलांचा जन्म झाला आहे. संकर्षणची पत्नी शलाका पांडे ही देखील एक कलाकार आहे. आपल्या खऱ्या आयुष्यात ती पेंटर असून आपले अनेक पेंटिंग ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिचे कौतुक देखील अनेक जण करताना दिसत असतात.