मराठी इंडस्ट्री मधील दिगग्ज अभिनेते म्हणजे अशोक सराफ! आपले अशोक मामा आणि त्यांची पत्नी यांविषयी सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. मराठी कलाविश्वातील गाजलेलं दिगग्ज नाव म्हणजे अशोक सराफ. उत्तम अभिनयशैली, परफेक्ट संवादफेक कौशल्य आणि प्रत्येक भूमिका आपल्या अभिनयाने जिवंत करुन ती सादर करण्याची हातोटी यामुळे अशोक सराफ अल्पावधीतच विशेष लोकप्रिय झाले.
अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांना मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हटले जाते. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी वयाची सत्तरी पार केली असली तरी आजही ते आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतात.
View this post on Instagram
बनवाबनवी, धमाल बाबल्या गणप्याची, आमच्यासारखे आम्हीच, जमलं हो जमलं असे कितीतरी चित्रपट त्यांनी हिट केले. अशोक सराफ यांच्या प्रमाणेच त्यांची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे हे साऱ्यांनाच माहीत आहे. अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ या अशोक सराफ यांच्या पत्नी असून या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
अलिकडेच निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई या मालिकेत झळकल्या होत्या. थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार कमी जणांना माहित आहे. अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी एक मुलगा देखील आहे. अशोक सराफ यांच्या मुलाचं नाव अनिकेत सराफ असं आहे. अनिकेत कलाविश्वापासून खूप दूर आहे. मात्र, तो अन्य एका क्षेत्रात आपले नशीब आजमावताना दिसत आहे.
सोशल मीडियावरही फारसा सक्रीय नसलेला अनिकेत प्रोफेशनल शेफ असल्याची माहिती समजते! बॉलिवूड अथवा मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टारची मुलं आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच क्षेत्रात करियर करताना दिसतात. केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्याला तोच ट्रेंड पाहायला मिळतोय. सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया, महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, विजय चव्हाण यांचा मुलगा वरद, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी आपल्या आई वडिलांप्रमाणेच याच क्षेत्रात करियर करत आहेत आणि यातील अनेकांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले आहे. पण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये असे एकूणच समजते.