राजा राणीची जोडी फेम संजीवनीचा हा ग्लॅमरस लुक तुम्ही पाहिलात का?

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची ग जोडी’ या सिरीयलच नाव समोर येताच आपल्या समोर येते ती म्हणजे, टॉक असा आवाज करणारी अवखळ संजीवनी आणि पोलिसाची भूमिका निभावणारा, बुलेटवर ऐटीत फिरणारा आपला मराठमोळा कोल्हापूरचा गडी रणजीत ढाले पाटील! सिरीयल सुरू झाल्यापासून ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यांच्या भेटण्या पासून ते लग्ना पर्यंतचा प्रवास सर्व मराठी प्रेक्षकांनी समरसून एन्जॉय केलेला आहे.

‘राजा राणीची ग जोडी’ या सिरीयल मध्ये अभिनेत्री शिवानी सोनार ही संजीवनीची भूमिका निभावत आहे. मालिकेतील तिच्या दमदार अभिनयामुळे शिवानी सोनार अल्पावधीतच महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. सिरीयल मध्ये कायम साध्या अवतारात अगदी साडी मध्ये दिसणारी संजीवनी रिअल लाईफ मध्ये अत्यंत ग्लॅमरस आहे! वेगवेगळे ड्रेसेस घालून फोटो शूट करणे तिला खूप आवडते. आपल्या सोशल मीडिया हँडल वरून ती आपल्या वेगवेगळ्या लुकचे सदाबहार फोटो अपडेट करत राहते.

आपल्या सर्वांची लाडकी संजू म्हणजेच शिवानी सोनार ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव आहे. आपल्या मॉडल लूक मधील विविध फोटो सोशल मीडियावर ती पोस्ट करत असते.

वेगवेगळ्या स्टाईल ने काढलेले शिवानीचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत! फोटोतून झळकणारी तिची निरागसता आणि पेहरावातील मॉर्डन लूक या अदांमुळे चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत एवढं नक्की!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप