तुम बिन फेम अभिनेता हिमांशूचा हा लूक पाहिलात का? फोटो पाहून ओळखणे होईल मुश्किल!!

सिनेमा जगतात उगवत्या सूर्याला तर सगळेच नमस्कार करतात, बॉलीवूडचे मोहक जगही असेच आहे. या इंडस्ट्रीत रोज नवे नवे सुंदर चेहरे छाप पाडून चित्रपटात आपले नशीब आजमावून पाहण्यासाठी येतात, त्यांच्यामध्ये काही आकाशाला जाऊन भिडतात तर काहींना या चंदेरी स्वप्नांच्या दुनियेचा पायथा गाठणे ही अवघड होऊन बसते!

‘तुम बिन’ चित्रपटातुन झळकलेला हिमांशू मलिक तुम्हाला आठवत असेलच! ज्याच्या गोंडस चॉकलेटी चेहऱ्यावर मुली फिदा झाल्या होत्या! पण आता हा स्टार पडद्यावरून गायब झाला आहे. असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या हिमांशूचा कलाविश्वातील वावर सध्या कमी झालेला दिसून येत आहे. इतकंच नाही तर तो कमालीचा बदलला आहे. त्यामुळे त्याला ओळखणंही चाहत्यांसाठी कठीण झालं आहे.

लोकांचे प्रेम मिळूनही या चमचमत्या इंडस्ट्रीत टिकुन राहणे सोपे नाही. ज्याचा डॅशिंग लूक पाहून एकेकाळी मुली त्याच्यासाठी वेड्या झाल्या होत्या.! मात्र आता त्याची अशी अवस्था झाली आहे की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. २००१ च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘तुम बिन’ हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता.

राकेश बापट, प्रियांशू चटर्जी, संदली सिन्हा यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे या कलाकारांसोबतच आणखी एका अभिनेता झळकला होता, तो म्हणजे हिमांशू मलिक. त्याकाळी या चित्रपटातील सर्वात हॅण्डसम हिरो म्हणून त्याने तरुणींच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या चित्रपटामुळे हिमांशू रातोरात सुपरस्टार बनला होता.

‘तुम बिन’मुळे चर्चेत आलेल्या हिमांशूचा या चित्रपटानंतर अचानकपणे कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे हा अभिनेता आता कसा दिसतो, काय करतो असे अनेक प्रश्न सोशल मीडिया वापरणाऱ्या नेटकऱ्यांना पडतात. म्हणूनच, हिमांशू मलिकविषयी काही नवीन गोष्टी या लेखातून जाणून घेऊयात. म्हणूनच शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचत रहा!

हिमांशूने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सोनू निगमच्या दीवाना या अल्बममध्ये तो पहिल्यांदा झळकला होता. त्यानंतर तो १९९६ मध्ये ‘काम सूत्रः द टेल ऑफ स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात केली.

त्यानंतर हिमांशू- जंगल, एलओसी कारगिल, ख्वाहिश, रोग, रेन यांसारख्या चित्रपटांमधून आपले अभिनय सामर्थ्य दाखवत झळकला आहे.

हिमांशू मलिक पडद्यावरून गायब झाला असला तरी तो अजूनही इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. इंडस्ट्रीतील या चॉकलेटी हिरोची अवस्था अशी झाली आहे की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. त्याच्या डोक्यावरून त्याचे केसही गायब झाले आहेत. आजकाल तो निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून काम करतो. मात्र, त्यातही त्याला फारसे यश मिळवता आले नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप