तो एकटाच दोन खेळाडूंसारखा आहे -भारतीय खेळाडूचे कौतुक करताना ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे विधान..!!

सध्या एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याची बरीच चर्चा आहे. त्याप्रमाणेच सध्या सुरु असलेल्या विंडीज आणि भारताच्या ५ टी-२० मालिकेची हि चारच्या रंगात आहे. या संदर्भातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने एक विधान करत भारतीय खेळाडूचे कौतुक केले आहे.

मॅकग्रा म्हणाला, क्रिकेट हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. हार्दिकमध्ये खूप आत्मविश्वास आहे. जर तो चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याचा त्याच्या फलंदाजीवरही सकारात्मक परिणाम होतो. तो एकात दोन खेळाडू आहे. ती एक लक्झरी आहे. तो एक चांगला आणि समंजस गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे आक्रमक फलंदाजीही आहे. त्याच्याकडे चांगली गेम प्लॅन आहे.

हार्दिक पंड्या सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत दिसत आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ १०० टक्के देऊ न शकलेल्या हार्दिकने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने हार्दिकचे कौतुक केले आणि त्याला कोणत्याही संघासाठी लक्झरी म्हटले आहे. हार्दिक पंड्या ज्याची क्षमता रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूंनी ओळखली आणि जो आता भारतीय क्रिकेट संघाचा उगवता तारा आहे.

हार्दिक पांड्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी चौरसिया, सुरत, गुजरात येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव हिमांशू पंड्या आणि आईचे नाव नलिनी पंड्या आहे. त्याचे वडील हिमांशू हे क्रिकेट खेळाचे प्रेमी होते. त्यामुळेच हार्दिकची क्रिकेटमधील आवडही वाढली. हार्दिकचे वडील अनेकदा हार्दिकला सामना दाखवण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन जात असत.

हार्दिक पंड्याच्या मोठ्या भावाचे नाव क्रुणाल पंड्या आहे जो स्वतः क्रिकेटर आहे. हार्दिकच्या वडिलांचा सुरतमध्ये कार फायनान्सचा चांगला व्यवसाय होता, परंतु जेव्हा क्रुणाल ६ वर्षांचा होता, तेव्हा कोणीतरी त्याला त्याच्या क्रिकेट कौशल्याचा विचार करून चांगले क्रिकेट कोचिंग घेण्यास सांगितले आणि आज हार्दिक या सर्वोच्च स्थानावर पोहचला आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप