इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग आहे. येथे संघ जगभरातील मोठ्या क्रिकेटपटूंवर खूप पैसा खर्च करतात. हे खेळाडू देखील आयपीएलमध्ये दररोज आपल्या सर्वोत्तम कामगिरीने संघाला सामन्यात विजय मिळवून देतात. हे सामनावीर खेळाडू सामनावीराचा किताब पटकावतात.
सामूहिक प्रयत्नातून संघाचा विजय होतो असे म्हणतात. असे असूनही, आयपीएल मध्ये असे काही खेळाडू आहेत जे एकट्याने संघाला विजय मिळवून देऊ शकतात. आज आपण अशा खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या शानदार खेळाने आपल्या संघाला केवळ सामनाच जिंकून दिला नाही तर अनेक वेळा सामनावीराचा किताबही पटकावला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणाऱ्या टॉप ४ खेळाडूंवर एक नजर टाकूया.
ख्रिस गेल: वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल हा आयपीएलचा सर्वात स्फोटक खेळाडू मानला जातो. त्याला युनिव्हर्स बॉस या नावा नेही ओळखतात. मोठे षटकार मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गेलने आयपीएल च्या १२४ डावांमध्ये १५१.०२ च्या स्ट्राइक रेटने ४४८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३२६ षटकार मारले आहेत. गेलने IPL मध्ये सर्वाधिक २१ वेळा मॅन ऑफ द मॅच खिताब जिंकला आहे.
महेंद्रसिंग धोनी: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनी आहे. कॅप्टन कूल एम एस धोनीने या कालावधीत १७ वेळा मॅन ऑफ द मॅच खिताब जिंकला आहे. धोनीची आयपीएल मधील सर्वोच्च धावसंख्या ८४* धावा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने ४ वेळा IPL चे विजेतेपद पटकावले आहे.
रोहित शर्मा: भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजी ने मुंबई इंडियन्स साठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. यादरम्यान रोहित ने एकूण १७ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. यासोबतच रोहित शर्माने ५ वेळा आयपीएल चे विजेतेपद पटकावून सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध केले आहे.
डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलचा सर्वात यशस्वी परदेशी खेळाडू आहे. वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद चा कर्णधार असताना २०१६ मध्ये आयपीएल विजेते पद मिळवले होते. फलंदाजी करताना आपल्या निडर शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नरने या काळात १७ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.