इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची १५ वी आवृत्ती २६ मार्चपासून सुरू झाली आहे. आयपीएल एक असे फॉरमॅट आहे जिथे प्रत्येक फलंदाज स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगवान खेळी करतो. या स्पर्धेने गेल्या काही वर्षांत क्रिकेटला कलाटणी दिली आहे, दरवर्षी भारतीय चाहते आयपीएल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत ५० धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज कोण आहेत ते पाहूया.
१. पॅट कमिन्स: आयपीएल २०२२ च्या हंगामातील १४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात होता, ज्यामध्ये KKR संघाने १६२ धावांचा पाठलाग करताना १०१ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पॅट कमिन्सने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला होता. कमिन्सने १५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने एकूण ५६ धावा केल्या होत्या.
२. केएल राहुल: केएल राहुल असा एक फलंदाज आहे ज्याला तुम्ही कोणत्याही फॉरमॅटमध्ये फलंदाजी करण्यास सांगू शकता. या खेळाडूने २०१८ मध्ये दिल्ली विरुद्ध ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या आणि या सामन्यात युसूफ पठाण आणि सुनील नरेनच्या मागे राहुलने १४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. या खेळीमुळे तो अजूनही या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
३. युसूफ पठाण: युसूफ पठाणने २०१४ मध्ये एका सामन्यात केकेआरला कठीण टप्प्यातून बाहेर काढले होते. या सामन्यात युसूफ पठाणने अवघ्या २२ चेंडूत ७२ धावा केल्या आणि अवघ्या १५ चेंडूत ५० धावांचा टप्पा गाठला होता. केकेआरने ३४ चेंडू शिल्लक राखून हा सामना जिंकला होता.
View this post on Instagram
४. सुनील नरेन: २०१७ मध्ये अष्टपैलू सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी तुफानी खेळी खेळली होती. नरेनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. केकेआरने हा सामना ६ विकेटने जिंकला होता.
५. सुरेश रैना: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा अनुभवी फलंदाज सुरेश रैना या यादीत पाचव्या स्थानावर आहे. २०१४ च्या क्वालिफायर मध्ये त्याने चेन्नई साठी ८७ धावांची शानदार खेळी केली होती. ज्या मध्ये १२ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात रैनाने अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. परंतु २०२२ च्या मेगा लिलावात सुरेश रैनावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही.