भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला संधी दिली नाही, हा निर्णय आश्चर्यकारक आहे पण आज आम्ही तुम्हाला सूर्यकुमार यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळण्याचे कारण सांगणार आहोत. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
यामुळे सूर्याला संधी मिळत नाहीये : खरं तर भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे तो सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी देऊ शकत नाही आणि जबरदस्तीमुळे हिटमॅनला संघात शुभमन गिल समावेश करावा लागला. सूर्याला संधी न मिळण्याचे कारण फक्त एक खेळाडू आहे आणि तो दुसरा कोणी नसून युवा सलामीवीर शुभमन गिल आहे आणि त्याचा चांगला फॉर्म सूर्याला प्लेइंग 11 मधून बाहेर काढत आहे.
कारण हे कि शुबमन गिलचा फॉर्म चांगला आहे आणि त्यामुळे त्याला खेळवणे आवश्यक आहे, त्यामुळे इशान किशनचे संघात स्थान निर्माण होत नाहीये. इशान संघात नसल्यामुळे यष्टिरक्षकाची कमतरता आहे आणि ईशान सलामीवीर असल्याने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकत नाही. यामुळेच भारतीय कर्णधार रोहित शर्माला केएल राहुलचा समावेश करणे भाग पडते कारण राहुल विकेटकीपिंग करू शकतो. यामुळेच सूर्याची जागा बनवली जात नाही.
View this post on Instagram
सूर्याने शतकाने केली वर्षाची सुरुवात : उल्लेखनीय आहे की, नुकतेच सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत शतक झळकावले आहे. सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये नाबाद ११२ धावांची खेळी केली होती. त्याने 2023 वर्षाची सुरुवात शतकाने केली. सध्या तो किती चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याची आकडेवारी सांगून जाते की सूर्याने भारतासाठी मागील 8 डावात 2 शतकांसह 338 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या फलंदाजाने भारतासाठी 16 एकदिवसीय सामन्यांच्या 15 डावात 384 धावा केल्या आहेत.