प्रेक्षकांच्या मागणी नुसार षटकार मारतो, भारताला मिळाला दुसरा ABD, टेस्ट मध्ये केले धमाकेदार शतक..!

सलीम दुर्रानी हा त्याच्या काळात भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मानला जात होता. पण दुर्रानी प्रसिद्ध होता कारण तो प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारत असे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद कडून खेळणारा अब्दुल समद हा टीम इंडियाचा दुसरा सलीम दुर्रानी मानला जातो. समदने शनिवारी रणजी ट्रॉफी मध्ये धडाकेबाज शतक झळकावले होते. जम्मू-काश्मीर कडून खेळताना त्याने पुद्दुचेरी विरुद्ध ६८ चेंडूत शतक झळकावले होते.

इंडियन प्रीमियर लीग मध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद कडून खेळणाऱ्या अब्दुल समदने रणजी ट्रॉफी मध्ये शतक झळकावले होते. जम्मू-काश्मीरकडून खेळताना त्याने पुद्दुचेरी विरुद्ध ६८ चेंडूत शतक करून रणजी इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक केले आहे. धमाकेदार फलंदाजी करून ही रणजी मधील ऋषभ पंतचा विक्रम मोडण्यात समद चुकला.

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज पंतच्या नावावर रणजी इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. पंतने २०१६ मध्ये झारखंड विरुद्ध ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. दिल्ली कडून खेळताना त्याने ६७ चेंडूत १३५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पंतने त्याच्या डावात ८ चौकार आणि १४ षटकार मारले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Samad (@abdulsamad)

समदने त्या सामन्यात ७८ चेंडूत १०३ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने १९ चौकार आणि दोन षटकार मारले होते. समदचा स्ट्राइक रेट १३२.०५ होता. त्याच्याशिवाय कामरान इक्बालने ९६, जतीन वाधवान ने ६९, शुभमन पुंडीरने ५१, आबिद मुश्ताकने ४० आणि परवेझ रसूलने ३१ धावा केल्या होत्या. जम्मू- काश्मीर संघाने पहिल्या डावात ४२६ धावा केल्या होत्या. पुद्दुचेरी कडून सागर त्रिवेदी ने पाच विकेट घेतल्या होत्या. पुद्दुचेरी ने पहिल्या डावात ३४३ धावा केल्या होत्या.

समदला सनरायझर्स हैदराबाद ने ४ कोटी मध्ये कायम ठेवले होते. त्यांच्याशिवाय उमरान मलिक आणि केन विल्यमसन यांना ही संघाने कायम ठेवले आहे. समदने २९ सप्टेंबर २०२० रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. तो आता पर्यंत दोन मोसमात सनरायझर्स कडून खेळला आहे. यादरम्यान त्याने २३ सामन्यांच्या १८ डावात १५.८६ च्या सरासरीने २२२ धावा केल्या आहेत. व त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १४६.०५ होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप