ना जाहिराती मधून झळकत, ना कोणत्या सिनेमा मध्ये दिसत तरी देखील राखी सावंतच घर कसं काय चालतं? एवढ्या मोठ्या संपत्तीची आहे मालकीण!

भारतीय बॉलिवूड सिनेइंडस्ट्री मधील सगळ्यात मोठी ड्रामा क्वीन म्हटलं की, एकच नाव पटकन डोळ्यापुढं येतं, ते म्हणजे राखी सावंत हिचं! आज राखी तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. आजच्या या लेखातून राखी बद्दलच्या पुष्कळशा तुम्ही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊयात!

खर सांगायचं झालं तर राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. तिने इंडस्ट्रीत आल्या नंतर निरु भेडा हे नाव बदलून राखी सावंत नवं हे नाव धारण केलं.

अग्निचक्र या धमाकेदार चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ही राखी, बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम साँग
वर दिलखेचक नृत्य करत थिरकताना दिसली. कित्येक हिट डान्स आयटम तिने स्वतःच्या नावावर केले आहेत. हल्ली ती चित्रपटातून फारशी झळकत नसली तरी सध्याला तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती शिल्लक आहे.

आता हातात एकही चित्रपट नसताना देखील राखीनं ही कोट्यवधींची संपत्ती अखेर जमवली तरी कशी? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडणं स्वाभाविक आहे.

सूत्रांच्या बातमीनुसार या घडीला राखीच्या नावावर एकूण ३७ कोटींची संपत्ती आहे. मुंबईत तिचे दोन मोठमोठे अलिशान फ्लॅट्स आहेत. ज्यांची सध्याची किंमत कोट्यवधीच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

काही मीडियाच्या बातमीनुसार, तिच्याकडे तब्बल ११ कोटी रूपयांचा एक बंगलाही आहे. तसेच फोर्ड की एंडेव्हर आणि फोक्स वॅगनची पोलो कार या दोन भारीतल्या गाड्या देखील तिच्याकडे संग्रही आहेत.

एकेकाळी राखीनं चक्क ५० रुपयांसाठी टीना अंबानींच्या लग्नात लोकांना वाढपी बनून जेवण वाढत होती. आज तीच राखी स्वतःच्या आलिशान बंगल्यात राहते.

सध्या राखीच पैसे कशा मार्फत मिळवते? : राखी स्टेज शो, बिगबॉस सारखा रिअ‍ॅलिटी शो. अशा शो मध्ये सहभागी होते, तसेच वेगवेगळे डान्सचे स्टेज शो हाच तिचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत मानला जातो. देशविदेशात ती विविध डान्स शो करते. तसेच अनेकदा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी होते.

राखीला जोरू का गुलाम, जिस देश में गंगा रहा है, ये रास्ते में अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळालेली. त्यातून तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे परंतु, तिला २००५ रोजी आलेल्या परदेसिया या गाण्याने मोठी ओळख मिळाली. या गाण्यानंतर राखी सावंत बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये फेमस आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप