टीम इंडियाने हॅटट्रिक कशी बशी वाचवली , तिसऱ्या T-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा वाईट पद्धतीने पराभव..!!

भारताने प्रथम खेळून २० षटकांत ५ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा संघ १९.१ षटकांत १३१ धावांत सर्वबाद झाला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांची मालिका २-१ अशी बरोबरीत आली आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता.

भारताने प्रथम खेळून २० षटकांत ५ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा संघ १९.२ षटकांत १३१ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून फलंदाजांमध्ये ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली. गोलंदाजीत हर्षल पटेलने चार बळी घेतले, तर युझवेंद्र चहलने तीन यश मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने पॉवरप्लेमध्ये २ गडी गमावून ३८ धावा केल्या. दरम्यान, कर्णधार टेंबा बावुमा (८) आणि रीझा हेंड्रिक्स (२३) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. पुढच्याच षटकात चहलने रॉसी व्हॅन डर ड्युसेनलाही (१) बाद करून दक्षिण आफ्रिकेला ४० धावांवर तिसरा धक्का दिला.

९ व्या षटकात चहलने ड्वेन प्रिटोरियसला (२०) पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपली दुसरी विकेट घेतली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने५७ धावांत चार विकेट गमावल्या. तरीही त्यांना विजयासाठी १२३ धावांची गरज होती. यानंतर डेव्हिड मिलर (3) यालाही हर्षलने आपला बळी बनवले, त्यामुळे आफ्रिकेचा निम्मा संघ ११ षटकांत ७१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.


त्याचवेळी क्लासेन आणि वेन पारनेल यांनी लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 14.4 षटकांत १०० धावांवर नेली. पण पुढच्याच चेंडूवर क्लासेन (29) चहलच्या हाती झेलबाद झाला. यानंतर पारनेल आणि कागिसो रबाडाने काही चांगले फटके मारले. पण 17व्या षटकात हर्षलने रबाडा (9) चहलच्या हाती झेलबाद केल्याने दक्षिण आफ्रिकेची ७ बाद११३  अशी मजल गेली.

यानंतर केशव महाराज (11), एनरिक नॉर्टजे (0) आणि तबरेझ शम्सी (0) हेही लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव १९.२ षटकांत १३१ धावांवर आटोपला. पारनेल (22) नाबाद राहिला. भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना भारताचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी धमाकेदार सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता 57 धावा जोडल्या. यादरम्यान गायकवाडने पाचव्या षटकात वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजेच्या पाच चेंडूंमध्ये सलग पाच चौकार मारले. दरम्यान, गायकवाडने 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र ११ व्या षटकात ९७ धावांवर भारताला पहिला धक्का बसला जेव्हा गायकवाड महाराजच्या चेंडूवर ५७ धावांवर बाद झाला.

 

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप