मी काहीही करायला तयार आहे.. विराट कोहलीने पहिल्यांदाच त्याच्या खराब फॉर्म बद्दल केले वक्तव्य..!

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सर्वांना या खेळाडू बद्दल माहिती आहे. आज कोहलीचे नाव जगातील महान क्रिकेटपटूंच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र तो सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. एक काळ असा होता की विराट कोहलीला रन मशीन म्हटले जायचे पण आज त्याला धावा बनवणे कठीण झाले आहे. अनेक क्रिकेट चाहते आणि दिग्गज त्याच्या फॉर्म बद्दल चिंतेत आहेत. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे. विराटचे हे विधान त्याच्याच खराब फॉर्म बद्दल आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली साठी २०२२ हे वर्ष खूप वाईट जात आहे. या वर्षी कोहलीची बॅट ना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये चालली होती ना IPL २०२२ मध्ये. अशा स्थितीत त्याच्या फॉर्म वर अनेक दिग्गज प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याला प्लेइंग ११ मधून वगळावे असे अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे. आता कोहली स्वत: पुढे आला असून त्यानेही वक्तव्य केले आहे. त्याने आपल्या खराब फॉर्म वर वक्तव्य केले आहे. संघाला त्याच्या कडून ज्या अपेक्षा आहेत ते करायला तयार आहे असे कोहली म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर जारी केलेल्या निवेदनात विराट कोहली म्हणाला, आशिया कप आणि विश्वचषक जिंकण्या साठी भारताला मदत करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मी संघा साठी काहीही करण्यास तयार आहे. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या खराब फॉर्मचा अनेकदा बचाव केला आहे.

अलीकडे तो म्हणाला, कोहली इतकी वर्षे इतके सामने खेळला आहे. तो इतका उत्तम फलंदाज आहे की त्याला खात्रीची गरज नाही. मला वाटते की फॉर्म वर खाली जाऊ शकतो हे मी गेल्या पत्रकार परिषदेत देखील सांगितले होते. हा खेळाचा एक भाग आहे, तो सर्व खेळाडूंच्या कारकिर्दीत घडतो. त्यामुळे इतके सामने जिंकणाऱ्या खेळाडूला फक्त १ किंवा २ डावांची गरज असते. माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की इतरांनाही असेच वाटते. त्याने खूप धावा आणि शतके झळकावली आहेत. त्याला अनुभवही आहे. सामने प्रत्येका साठी वाईट असतात, ज्यामुळे फॉर्मवर परिणाम होतो आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप