मी १० चेंडूत ५ षटकार मारले, धोनी म्हणाला- तयार राहा आम्ही तुला CSK मध्ये घेणार आहोत..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील दुसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) पुन्हा एकदा IPL मध्ये उतरण्यास तैयार झाली आहे. या वर्षी सीएसकेने १४ कोटींची मोठी रक्कम देऊन दीपक चहरचा संघात समावेश केला आहे. त्यानंतर या वेगवान गोलंदाजाने मोठा खुलासा केला आहे. दीपक चहरने सांगितले की, महेंद्रसिंग धोनीने त्याला २०१७ मध्येच सांगितले होते की, तो पुढील वर्षी चेन्नईसाठी सर्व सामने खेळणार आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने यावर्षी दीपक चहरवर १४ कोटींची मोठी रक्कम देऊन संघात सामील केला आहे. ज्यानंतर CSK चे चाहते खूप आनंदित व आश्चर्यचकित झाले कारण CSK ने IPL च्या इतिहासात कोणत्याही खेळाडूसाठी १० कोटी पेक्षा जास्त खर्च केले नाहीत. मात्र आता खुद्द दीपक चहर यानेच यामागचे कारण सांगितले आहे.

स्पोर्ट्सशी बोलताना दीपक चहर म्हणाला, ‘सीएसके सोबतचा माझा प्रवास २०१६ मध्ये सुरू झाला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मी संघर्ष करत होतो. सुदैवाने हृषिकेश कानिटकर पुणे सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक झाल्यावर त्यांनी मला चाचणीसाठी बोलावले होते. मी एक निवड सामना खेळलो जिथे स्टीफन फ्लेमिंगने मला पाहिले होते. मी नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी केली आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि काही चौकार आणि मोठ्या षटकारांसह पन्नास धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि मी पुन्हा ५० धावा केल्या. त्यामुळे जेव्हा फ्लेमिंगने मला पुण्यात निवडले, तेव्हा मला एक अष्टपैलू फलंदाज म्हणून निवडले गेले जो बॅटिंग करू शकतो आणि नवीन चेंडूने गोलंदाजी करू शकतो.

पुढे बोलताना दीपक चहर म्हणाला, ‘निवड झाल्यानंतर मी धोनी भाईला कॅपमध्ये भेटलो होतो. मी सराव सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलो होतो. मी १० चेंडूत ५ षटकार मारले होते. त्यानंतर मी खेळताना  जखमी झालो आणि बाहेर गेलो होतो. तेव्हा धोनी भाईंनी पाहिले की मी षटकार मारतो आणि चेंडू स्विंग करू शकतो. त्या मोसमात मी दुखापती मुळे जास्त सामने खेळलो नाही, पण पुढच्या मोसमात धोनी भाईने मला सांगितले “तयार राहा” आम्ही पुढच्या मोसमात तुला चेन्नई संघात सामील करणार आहोत. तू सर्व सामने खेळणार आहेस. आम्हीतुझ्यावर भरवसा ठेवतो, तू जे करू शकतोस ते करत रहा.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप