मी माझ्या मुलाचा सामना पाहायला कधीही जाणार नाही: सचिन तेंडुलकर..!

क्रिकेट चा देव सचिन तेंडुलकर ला आपला मुलगा अर्जुनला क्रिकेट मध्ये उत्कृष्ट झालेला पाहायचे आहे, पण तो त्याचे सामने पाहत नाही. मास्टर ब्लास्टर ने शेअर केले आहे की जेव्हा त्याचा मुलगा सामना खेळायला जातो तेव्हा तो त्याचे सामने पाहत नाही. यंदाच्या आयपीएल च्या १५ व्या हंगामातील मेगा लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सने विकत घेतले आहे. अर्जुन सध्या मुंबई च्या रणजी संघाचा भाग आहे आणि आयपीएल मेगा लिलावात त्याला मुंबई इंडियन्स ने ३० लाख रुपयांना विकत घेतले आहे.

आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर चा सामना न पाहण्याच्या प्रश्नावर भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणाला की अर्जुन ला खेळावर प्रेम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे अशी माझी इच्छा आहे. तो म्हणाला, तो फुटबॉल खेळायचा आणि नंतर त्याला बुद्धिबळ खेळायला आवडायचे. त्याच्या आयुष्यात क्रिकेट नंतर आले. सचिन आपल्या मुलाला ही गोलंदाजी च्या उत्तम प्रशिक्षणा साठी इंग्लंडला घेऊन गेला होता. अर्जुन ने इंग्लंड क्रिकेट संघाच्या फलंदाजांना नेट मध्ये ही भरपूर गोलंदाजी केली आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर ही एकदा अर्जुन च्या वेगवान चेंडूवर जखमी झाला होता.

सचिन म्हणाला, जेव्हा पालक आपल्या मुलाला खेळताना पाहतात तेव्हा त्याचा त्यांच्या वर दबाव येतो, त्यामुळे मी अर्जुन खेळताना पाहत नाही. त्याला क्रिकेट वर प्रेम करण्याचे स्वातंत्र्य असावे आणि अर्जुन ने त्याला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे. त्याला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जरी मी त्याचा खेळ बघायला गेलो तरी कुठेतरी लपून बसेन. अर्जुनला कळणार नाही की मी तिथे आहे.

अर्जुन तेंडुलकर च्या क्रिकेट कारकिर्दी वर नजर टाकली तर त्याने आता पर्यंत दोन सामने खेळले असून त्यात त्याने केवळ तीन धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने दोन ब’ळी घेतले असले तरी त्याची सरासरी ३३.५० आहे. अर्जुन तेंडुलकर च्या कारकिर्दीत ३३ धावांत एक विकेट आहे. अर्जुन तेंडुलकरने १५ जानेवारी २०२१ रोजी मुंबईसाठी T-२० पदार्पण केले होते. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मधील त्याच्या पहिल्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली आणि तीन षटकात ३४ धावा दिल्या होत्या. अर्जुन तेंडुलकर ची क्रिकेट कारकीर्द फार मोठी नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप