अथक संघर्षातुन जिद्दीने वर आलेल्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या एका चित्रपटासाठीच्या मानधनाची रक्कम जाणून अभिमान वाटेल..!

सिनेविश्वात नेहमीच असंख्य सेलिब्रिटी कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि असलेल्या आलिशान घरांमुळे चर्चेत येतात. परंतु, हे आलिशान वैभव मिळविण्यामागे अनेक कलाकारांनी प्रसंगी प्रचंड मेहनत आणि संघर्ष केलेला असतो. इंडस्ट्रीतील शाहरुख खान, सोनू सूद यांसारख्या कलाकारांचा संघर्ष आणि त्यांचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु, सिनेविश्वात असाही एक अभिनेता आहे

त्याने मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्री मध्ये ही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवुन नावलौकिक प्राप्त केला आहे! मात्र, चित्रपटांच्या या चंदेरी दुनियेत स्वतःच हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत आणि जोडीला कष्ट देखील सोसावे लागले आहेत. मीडियाच्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या या बिकट संघर्षा बद्दलची माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणजे शरद केळकर (sharad kelkar) उत्तम दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या शरदने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप मोठा स्ट्रगल केला आहे. शरदने मनीष पॉलच्या पॉडकास्ट कार्यक्रमादरम्यान त्याच्या स्ट्रगल काळातील काही आठवणींना उजाळा देत असताना याबद्दल माहिती दिली. यावेळी शरद म्हणाला, एक वेळ अशी पण आलेली की त्याच्याकडे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी देखील पैसे नसल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

“माझ्यावर एक वेळ अशी आली होती की माझ्या बँकेच्या खात्यात एक रुपयाही शिल्लक नव्हता. त्यात माझ्या खात्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज होतं. तसच इतरांचेही पैसे द्यायचे होते. पण, क्रेडिट कार्डमध्ये पैसे नसल्यामुळे ते सुद्धा बंद झालं होतं. लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटतं. पण, त्यांच्या यशामागे त्यांनी केलेला संघर्ष नाही दिसत”, असं शरद यावेळी म्हणाला.

दरम्यान, शरद केळकर हा हँडसम हिरो सध्या लक्ष्मी चित्रपटातील त्याच्या गाजलेल्या अभिनयामुळे चर्चेत आला आहे. मध्य प्रदेशातुन असलेला शरद मूळचा ग्वाल्हेर या शहराचा आहे. त्याने संपूर्ण शिक्षण ग्वाल्हेरमध्येच पूर्ण केलं आहे.

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी तो स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत होता. परंतु, त्याच्यातील अभिनयाची चुणूक त्याला स्वस्थ बसून देत नव्हती म्हणूनच चालू नोकरीला राम राम ठोकत त्याने बॉलिवूडची चंदेरी वाट पकडली आणि आज एक तगडं मानधन घेणारा अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला आहे!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप