चंदेरी दुनियेची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुलीला वाटत असते कि आपण हि एक मोठी अभिनेत्री व्हावे. पण कित्येक जणींचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. परंतु काही कलाकार असे देखील असतात जे स्वतःच्या अथक मेहनतीने हे स्वप्न पूर्ण देखील करतात. आजच्या या लेखात आम्ही अशाच एका सुंदर मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल माहिती देणार आहोत.
View this post on Instagram
आम्ही बोलत आहोत सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या बद्दल. या लेखातून आम्ही तुम्हाला प्राजक्ताची जीवन कथा सांगणार आहोत, अभिनेत्री होण्या पर्यंतचा तिचा हा प्रवास खूप थक्क करणारा आहे. एका छोट्याश्या गावातून पुढे आलेली प्राजक्ता आज छोट्या पडद्यावर सर्वांच्या मनावर राज्य करत आहे!
प्राजक्ता माळी हीचा जन्म सोलापूर जिल्यातील पंढरपूर येथे झाला असून पंढरपूर शहर हे पांडुरंग आणि रुक्मिणी या देवस्थानासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच सगळ्याची लाडकी प्राजक्ता माळी हि वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षा पासूनच भरत नाट्यम आणि अभिनयाची धडे गिरवत होती. तसेच तिने विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्याच्या ललित कला केंद्र येथुन उच्च शिक्षण पूर्ण केलेले आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताने शिक्षण पूर्ण केल्या नंतर अभिनयाच्या क्षेत्रात आपले नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला. ती शिक्षण घेत असतानाच युनिव्हर्सिटी टॉपर होती. तसेच तिला नृत्यासाठी स्कॉलरशिप देखील मिळत होती, तिच्या अभिनयासाठी तिला आतापर्यंत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तसेच पुढे तिने अभिनय आणि नृत्य या दोन्हींचा अचूक समन्वय राखत अभिनयामध्ये खूपच मोठी भरारी घेतली. “जुळून येती रेशीम गाठी, नकटीच्या लग्नाला यायच हा” या सारख्या बहारदार मालिकां मध्ये अतिशय लाघवी अभिनय करून तिने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले.
आता तिच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर तिने “खो-खो, हंपी,पार्टी,डोक्याला शॉट, डॉक्टर काशिनाथ घाणेकर” या सारख्या चित्रपटांमधून उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. तसेच तिने खूप साऱ्या कार्यक्रमां मध्ये सूत्र संचालनची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली आहे! अतिशय उत्कृष्ट रित्या ती सूत्रसंचालन करते.
View this post on Instagram
तसेच तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूपच आवडतो तिची बोलण्याची अदा देखील खूप मोहक आहे. प्राजक्ताचा सामाजिक कार्याचा सहभाग देखील खूप महत्वपूर्ण आहे. तिने कोरोनाचे लॉक डाउन असो किंवा महापूर असो दोन्ही वेळेस तिने खूप मोठ्या मनाने लोकांना मदत केली आहे.
तसेच तिच्या फॅशन सेन्स बद्दल विचार केला तर तीचे कौतुन करावे तेवढे कमीच आहे. तिच्या या फॅशन सेन्स मुळेच तिला २०२० साली स्टाईल रत्न सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. म्हणूनच तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे एका छोट्याश्या गावातून येऊन आज प्राजक्ता एवढी मोठी स्टार बनली आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे!