खेळाडूने चूक केली तर त्याला शिक्षा होते, पण अंपायरने चुकीचा निर्णय दिला तर काय होते? घ्या जाणून..!

आयपीएल २०२२ च्या ३४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात या हंगामातील सर्वात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सामन्यात राजस्थान ने रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा १५ धावांनी पराभव केला होता. पण सामन्याच्या शेवट च्या षटकात अंपायर च्या वादग्रस्त निर्णया मुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सामना संपण्या पूर्वी आपल्या खेळाडूंना ड्रेसिंग रूम मध्ये बोलावण्याचा प्रयत्न केला होता. यावरून क्रिकेट विश्वात अनेक वाद निर्माण झाले आहेत.

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीचा खेळाडू रोव्हमन पॉवेल दिल्लीला विजय मिळवून देण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. डावाच्या शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स ला विजया साठी ३६ धावांची म्हणजेच ६ षटकारांची गरज होती. त्याने शेवटच्या षटकात ३ चेंडूत सलग ३ षटकारही ठोकले होते. चेंडू बॅट्समन च्या कमरेच्या वर असल्याने तिसऱ्या चेंडू मुळे वाद निर्माण झाला होता. तो नो बॉल होता पण अॅनफिल्ड अंपायर ने त्याला लीगल डिलिव्हरी म्हटले होते.

याला कर्णधार ऋषभ पंतने विरोध केला होता. त्या नंतर ऋषभ पंतला मॅच फी च्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. चुकीचा निर्णय घेतल्या ने अंपायरला शिक्षा होईल, असे एका ट्विटर यूजरने स्पष्ट केले होते. खरे तर अंपायर कडून चुकीचे निर्णय येणे सामान्य आहे. अर्थात, क्रिकेटची स्पर्धात्मकता पाहता, आजचे नवीन तंत्रज्ञान वापरणे आणि मैदानी पंचांचे निर्णय घेऊन पुढे जाणे यात समतोल साधण्याची गरज आहे.

कोणताही पंच जाणीव पूर्वक चुकीचा निर्णय घेत नाही हे खरे आहे. मात्र, काही निर्णय थर्ड अंपायर वर सोडल्यास क्रिकेट आणि चाहत्या साठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. जर एखादा पंच वारंवार चुकीचा निर्णय घेत असेल तर आयसीसी त्या अंपायरला हवे असल्यास काढून टाकू शकते. यापूर्वी अनेकदा अंपायर बदलण्यात आले आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप