केएल राहुल कर्णधार झाल्यास, या ३ खेळाडूंना कसोटी संघातून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू शकतो..!

विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले आहे. तेव्हापासून भारतीय संघाच्या नव्या कसोटी कर्णधाराच्या चर्चेला जोर चडला आहे. ज्यांच्या शर्यतीत केएल राहुल सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे, कारण मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्माचा फिटनेस त्याला साथ देत नाही आणि राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दुसऱ्या सामन्यातही संघाचे नेतृत्व करताना दिसला होता.

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा तीन फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे करिअर केएल राहुल कर्णधार बनताच कसोटी क्रिकेटमध्ये संपुष्टात येऊ शकते.

पृथ्वी शॉ : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. तेव्हापासून हा खेळाडू भारतीय संघाचा भावी स्टार मानला जात होता. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना, पृथ्वीने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजसमोर शतक झळकावले होते, परंतु तेव्हापासून २२ वर्षीय पृथ्वीने केवळ ५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४२.३८ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत.

पृथ्वीने २०२० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जिथे त्याला खातेही उघडता आले नव्हते. संघात पुनरागमन करण्यासाठी तो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता, पण केएल राहुल आता कसोटी कर्णधार झाला तर पृथ्वी कसोटी संघात पुनरागमन करू शकणार नाही. कारण पृथ्वी संघात ओपनिंग करतो आणि यावेळी ओपनिंगसाठी संघात अनेक तगडे खेळाडू आहेत.

शुबमन गिल : शुभमन गिलचे टॅलेंट कोणत्याही क्रिकेटप्रेमीपासून लपलेले नाही. शुभमन गिल हा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील १९ वर्षाखालील संघाचा भाग होता. केएल राहुल कर्णधार झाल्यावर पृथ्वीप्रमाणेच शुभमन गिलचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन अडचणीत येऊ शकते. २२ वर्षीय शुभमनने कसोटी क्रिकेटमध्ये ओपनिंग केली आहे. तो आतापर्यंत भारताय संघात १० सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने ३२.८२ च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहेत. तसेच चार अर्धशतकेही केली आहेत. मात्र, त्याला आतापर्यंत एकही शतक झळकावण्यात यश नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलने भविष्यात संघाचे कर्णधारपद भूषवले तर तो तेथे सलामीला येईल आणि त्याचा जोडीदार म्हणून फक्त रोहित शर्मा खेळताना दिसेल.

मयंक अग्रवाल : केएल राहुलच्या जिवलग मित्रांपैकी एक असलेल्या मयंक अग्रवालसाठीही राहुलचे कर्णधार बनणे चांगले ठरणार नाही. कारण अग्रवालही संघात ओपनिंग करतो. ३० वर्षीय अग्रवाल दक्षिण आफ्रिका मालिकेत भारतीय संघाचा भाग होता, पण फलंदाजीत तो फार काही करू शकला नाही. यामुळेच केएल राहुल कर्णधार बनताच भारतीय कसोटी संघातील ओपनरचे नाव निश्चित होईल. अशा परिस्थितीत मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांना कसोटी क्रिकेटमधून बाहेर जाऊ शकतात.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप