रोहित शर्मा च्या नेतृत्वा खाली मुंबई इंडियन्स ने पाच वेळा आयपीएल चे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. गेल्या मोसमात, मुंबई इंडियन्स ला प्लेऑफ मध्ये ही स्थान मिळवता आले नाही, आयपीएल च्या सर्वात यशस्वी संघात ही अनेक मोठ्या कमजोरी आहेत, ज्या मुळे त्यांना शेवट च्या हंगामात काही विशेष कामगिरी दाखवता आली नाही. या मोसमात ही कर्णधार रोहित शर्माने या चुका दुरुस्त केल्या नाहीत, तर या वेळी ही संघ प्लेऑफ पर्यंत चा प्रवास करू शकणार नाही.
आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्माकडे संजय यादव, फॅबियन ऍलन, मयंक मार्कंडे आणि मुरुगन अश्विन सारखे फिरकीपटू म्हणून पर्याय आहेत, परंतु मधल्या षटका साठी राहुल चहर, जयंत यादव किंवा कृणाल पंड्या यासारख्या खेळाडूंच्या अभावी संघाला खूप नुकसान होणार आहे. यंदा च्या मोसमात रोहित शर्माला फिरकी पटूंची कमतरता जाणवणार आहे. या सोबतच ट्रेंट बोल्ट च्या जाण्याने संघा समोरील अडचणी वाढल्या आहेत. यासह जोफ्रा आर्चर देखील या हंगामा साठी अनुपलब्ध होणार आहे.
View this post on Instagram
इशान किशन आयपीएल २०२२ साठी कर्णधार रोहित शर्मा सोबत ओपनिंग करणार आहे. दुसरीकडे, सूर्य कुमार यादव, ज्याची उपलब्धता सध्या दुखापती मुळे अज्ञात आहे आणि यात किरॉन पोलार्ड याचा ही समावेश आहे. या फलंदाजांना पाहता मुंबई इंडियन्स ची फलंदाजी खूपच मजबूत असल्याचा अंदाज बांधता येतो. त्याच वेळी डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, अनमोल प्रीत सिंग आणि टीम डेव्हिड सारखे फलंदाज ही मुंबई इंडियन्स शी जोडले गेले आहेत, या वरून मुंबई इंडियन्स कडे भरपूर फलंदाज असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएल २०२२ ची सुरुवात CSK आणि KKR यांच्यातील सामन्या ने झाली होती. त्याच वेळी आयपीएल चा सर्वात यशस्वी संघ म्हटल्या जाणार्या मुंबई इंडियन्स चा पहिला सामना २७ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम वर रोहित शर्माच्या नेतृत्वा खाली पहिला सामना खेळला गेला होता ज्यात मुंबई इंडियन्स ला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी रोहित शर्मा आपल्या संघाला प्लेऑफ मध्ये नेण्यात यशस्वी ठरतो की नाही, हे आता स्पर्धेतच कळणार आहे.