रोहित शर्माने पुन्हा केली ही चूक, तर त्याच्यावर लागू शकतो बॅन..!

आयपीएलच्या इतिहासात कर्णधारपद सिद्ध करणारा रोहित शर्मा सध्याच्या मोसमात खूप संघर्ष करत आहे. मुंबई इंडियन्सला ५ वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलचा १५ वा हंगाम निराशाजनक ठरत आहे, त्यामुळे रोहित शर्मा पूर्ण पणे बॅकफूट वर गेला आहे. एकीकडे संघाच्या पराभवाने रोहित शर्मा सतत निराश आणि नाराज आहे, तर दुसरीकडे सध्या त्याच्या वरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये, तिथे आता IPL च्या या मोसमात त्याच्या वर बंदीचा धोका आहे.

बुधवारी पंजाब किंग्ज कडून मुंबई इंडियन्सला पुन्हा पराभव पत्करावा लागला होता. यासह मुंबई इंडियन्सचा या मोसमात सलग पाचवा पराभव असून, ते या मोसमातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा करत आहेत. लागोपाठच्या पराभवा मुळे रोहित शर्मा अधिकच अडचणीत सापडला आहे, जिथे तो आता या मोसमात एका सामन्याच्या बंदीला सामोरे जाण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. या मोसमातील आगामी सामन्यामध्ये आणखी एक चूक रोहित शर्माला १ सामन्यातून बाद देखील करू शकते.

मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेट मध्ये अडकला आहे, जिथे मुंबई ला पंजाब किंग्ज विरुद्ध निर्धारित वेळे पूर्वी निर्धारित ओव्हर टाकता आली नाही. या नंतर कर्णधार रोहित शर्मा सह संपूर्ण संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित शर्मा या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटच्या प्रकरणात अडकला आहे. आता रोहित शर्मा इतर कोणत्या ही सामन्यात स्लो ओव्हर रेट साठी दोषी आढळल्यास नियमा नुसार त्याच्या वर ३० लाख रुपयांच्या दंडासह एका सामन्याची बंदी घालण्यात येईल.

आयपीएल मधील स्लो ओव्हर रेटचा नियम बघितला तर एका सामन्यात एखादा संघ स्लो ओव्हर रेट मध्ये पकडला गेला तर त्या संघाच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड ठोठावला जातो. या नंतर दुसऱ्यांदा ही चूक केल्यास कर्णधाराला २४ लाखांचा दंड, तर संघातील इतर खेळाडूंना ६ लाख किंवा मॅच फी च्या २५ टक्के या पैकी जी रक्कम कमी असेल ती भरावी लागते.

दुसरीकडे, जर एखाद्या संघाने हंगामात तिसऱ्यांदा चूक केली तर त्याचा फटका कर्णधारा ला सहन करावा लागतो, ज्या मध्ये कर्णधारा ला ३० लाख रुपयांचा दंड तसेच एका सामन्या ची बंदी लागू शकते, व उर्वरित खेळाडूंना रु. १२ लाख किंवा रु. ५०% मॅच फी या पैकी जे कमी असेल ते भरावे लागते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप