‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची Offer या अभिनेत्रीनी Accept केली असती तर, आज मार्केट मध्ये फक्त त्यांची हवा असती..!

अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने आतापर्यंत ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे समजते. या चित्रपटातील आलियाने निभावलेल्या भूमिकेला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूप नावाजण्यात येत आहे. पण गंगुबाईच्या या भूमिकेसाठी आलिया भट्टच्या आधी ‘या अभिनेत्रींना’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ऑफर दिली असल्याची माहिती समजते.

 

View this post on Instagram

 

A post shared by BVLGARI Official (@bulgari)

सर्वप्रथम अभिनेत्री प्रियांका चोप्राला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी होती. यामुळे तिने गंगुबाईची भूमिका करण्यास नकार कळवला होता. त्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण काही काळानंतर राणी मुखर्जी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याची समजते.

अभिनेत्री राणी मुखर्जीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ आणि ‘सावरिया’ या दोन चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनला देखील ऑफर करण्यात आला होता आणि दीपिकाच या चित्रपटामध्ये गंगुबाईची भूमिका साकारणार आहे, असं म्हंटल जातं होत. पण अखेर या चित्रपटामध्ये गंगुबाईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टची निवड करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Indira Tiwari (@itsindiratiwari)

अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भवऱ्यात सापडला होता. गंगूबाईच्या कुटुंबियांनी या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी विरोध दर्शवला होता. गंगूबाईने समाजासाठी काम केले होते, पण तिला सिनेमात सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आले असल्याने गंगूबाईचे कुटुंबीय चित्रपटाच्या निर्मात्यांवर नाराज झाले होते. या सिनेमाविरोधात गंगुबाईच्या कुटुंबियांनी न्यायालयातही धाव घेतली होती.

गंगूबाईच्या कुटूंबियांनी नेमलेल्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते की, ट्रेलर पाहून गंगुबाईच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या महिलेला यात सेक्स वर्कर म्हणून दाखवलं आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे! गंगूबाईचे चित्रण ज्या पद्धतीने केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे. एका समाजसेविकेला तुम्ही वेश्या म्हणून सर्वांसमोर सादर केले आहे. असे कोणत्या परिवाराला आवडेल? गंगूबाईच्या कुटूंबियांचे वकील या प्रसंगी म्हणाले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप