Covid-19 मधून बरे झाल्यानंतर ही पथ्य पाळल्यास, कोणतीही अडचण येणार नाही!

काही दिवसांपासून दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोविड-१९ पासून बरे होण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

कोविड-१९ काही दिवसांच्या दिलासानंतर कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. अश्या परिस्थित बहुतेक लोक केवळ घरी राहूनच कोविड -१९ मधून बरे होऊ आहेत. या काळात औषधे आणि मल्टीविटामिन्ससोबतच सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे, कोरोनाव्हायरसमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होत असते. अशा परिस्थितीत जलद बरे होण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहाराची नितांत गरजअसते.

कोरोनाव्हायरसपासून बरे झालेल्या लोकांना पुनर्प्राप्ती प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती पुन्हा निर्माण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये.

कोविड-१९ च्या रुग्णांनी सकाळी ७ भिजवलेले बदाम, ३ अख्खे अक्रोड आणि ६ मनुके खावेत. यानंतर आले आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेला काश प्या.  काही वेळाने कच्च्या लसणाच्या 2 कळ्या चघळल्या पाहिजेत. यासोबत नाश्त्यात ऑम्लेट खाऊ शकता. यानंतर, किवी, संत्रा, सफरचंद, पपई, अननस यासारखे कोणतेही फळ खा.

जेवणात नेहमी मल्टीग्रेन पिठापासून बनवलेल्या रोट्यांचा समावेश करा. याशिवाय दुपारच्या जेवणात एक वाटी ताजं दही नक्की घ्या. दुपारच्या जेवणानंतर खजूराचे दोन तुकडे खावेत. रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. यासाठी तुम्ही शेंगदाण्याची खिचडी आणि हंगामी भाज्या खाऊ शकता. त्याच वेळी, रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास हळदीचे दूध प्यावे.

कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर काही दिवस फळांचे रस, साखर, मध आणि जड अन्न टाळावे कारण त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय मद्यपान, धुम्रपान इत्यादी कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये. त्या बाराबरोबच नियमित व्यायाम आणि चिंतन मनन  करावे जेणे करून मन शांती मिळेल.

व्यायाम केल्याने तुम्ही जरा तंदरुस्त आणि फिट राहाल. व्यायाम केल्याने तुच्या शरीरातील रक्त प्रवाह वाढल्याने “शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम” असे आपली वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते आणि मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळेतील पुस्तकात वाचले असेल आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते परंतु एवढे वाचून किंवा ऐकूनसुद्धा नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून फिरायला जाणाऱ्या किंवा व्यायामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे असे दिसते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप