क्रिकेट ऑस्ट्रेलिया क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर ने बनवलेला पुष्पाचा हा व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर लवकर पहा!!

साऊथ इंडस्ट्री असो की बॉलिवूड सगळीकडेच “पुष्पा द राईज” चित्रपटाचा भरपूर बोलबाला झाला आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग, मारामारीची दृश्ये अशी प्रत्येक गोष्ट चर्चेत आली असून यातील कलाकारांना देखील विशेष प्रसिद्धी मिळत आहे. सतत काहीतरी निमित्त होऊन हा चित्रपट सोशल मीडियावर सारखाच चर्चेत येत असल्याचे दिसून येत आहे.

हल्ली नुकताच ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नर याचा युट्युब वरील एक व्हिडिओ देखील भलताच चर्चेत आलेला दिसत आहे, रसिक प्रेक्षक या व्हिडीओला फार आवडीने पाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक चित्रपटप्रेमी हौशी मंडळी याच्या गाण्याच्या रिल्स बनवून स्वतःला पुष्पांच्या भूमिकेत झोकून देत आहेत.!

नुसते बॉलिवूड, टॉलिवूड या दोन्ही पर्यंत मर्यादित न राहता ‘पुष्पा’ सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये या सिनेमाबद्दल पडलेली भुरळ अनुभवायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टिमचा फलंदाज डेविड वॉर्नरही या बाबतीत मागे नाही! पुष्पां फेव्हर पासून तो देखील स्वतःला वाचवू शकला नाहीये!! त्याच्यावरही पुष्पा सिनेमाने जादू केली आहे. वॉर्नरने काही दिवसांपूर्वी पुष्पातील श्रीवल्ली गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला होता. यावर नेटकर्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला कॉमेंट्स मधून मिळालेला दिसला. म्हणूनच आता त्याने पुष्पां मधला आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यावेळी त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत पुष्पातील सिनेमातील गाण्यावर नाही, त्यातील डायलॉग वर देखील नाही तर हा आहे, अॅक्शन सीनमधला व्हिडिओ!! व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, यात वॉर्नरने सिनेमातील काही जबरदस्त ऍक्शन सीनची निवड केली आहे. त्याने सर्वच सीनमध्ये अल्लू अर्जुनच्या चेहऱ्यावर आपला चेहरा मर्ज केला आहे. हे काम इतकं बारकाईने केलं की, ते मर्ज केल्यासारखं दिसतच नाहीये. एकंदर व्हिडिओ सुपर से उपर बनला आहे. त्याच्या या व्हिडिओला खुद्द अल्लू अर्जुनने देखील दाद दिल्याचे सूत्रांकडून कळते.

तुम्हाला हा व्हिडीओ बघून वाटेल की, सिनेमाचा खरा हिरो वॉर्नरच आहे. डेविड वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर फारच वेगात व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करून डेविड वॉर्नरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,

‘अॅक्टिंगला अल्लू अर्जुनने फारच सोपं बनवलं आहे’. या व्हिडीओला ३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

डेविड वॉर्नरने याआधी ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर अल्लू अर्जुन स्टाइलने डान्स केला होता. या व्हिडीओलाही सोशल मीडियावर खूप पसंत केलं गेलं. त्याने सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळीही पुष्पांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याचे हे दोन्ही व्हिडीओ नेटकर्यांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याच्या चर्चेला सगळीकडे उधाण आले आहे.!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप